हा या वर्षातील २६० वा (लीप वर्षातील २६१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : सप्टेंबर ११ च्या अतिरेकी हल्ल्यांनंतर न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज पुन्हा सुरू झाले.
१९८८ : दक्षिण कोरियातील सेऊल येथे २४ व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली.
१९८३ : वनीसा विल्यम्स ’मिस अमेरिका’ बनणारी पहिली कृष्णवर्णीय स्त्री ठरली.
१९५७ : मलेशियाचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश
१९४८ : हैदराबादच्या निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद संस्थान भारतात विलीन झाले.
१६३० : बॉस्टन शहराची स्थापना झाली

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१ : डॉ. राणी बंग – समाजसेविका
१९५० : नरेन्द्र मोदी – गुजरातचे मुख्यमंत्री
१९३९ : रविंद्र सदाशिव भट – गीतकार (मृत्यू: २२ नोव्हेंबर २००८)
१९३८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे – लेखक, कवी आणि टीकाकार (मृत्यू: १० डिसेंबर २००९)
१९३७ : सीताकांत महापात्र – १९९३ चा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते प्रख्यात ओडिया कवी
१९३० : लालगुडी जयरामन – व्हायोलिनवादक, संगीतकार व गायक (मृत्यू: २२ एप्रिल २०१३)
१९२९ : अनंत पै ऊर्फ ’अंकल पै’ – ’अमर चित्र कथा’ चे जनक (मृत्यू: २४ फेब्रुवारी २०११)
१९१५ : मकबूल फिदा हुसेन – चित्रकार व दिग्दर्शक (मृत्यू: ९ जून २०११)
१९१४ : थॉमस जे. बाटा – बाटा शू कंपनीचे संस्थापक (मृत्यू: १ सप्टेंबर २००८)
१९०६ : ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १ नोव्हेंबर १९९६)
१९०० : जे. विलार्ड मेरिऑट – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८५)
१८८५ : केशव सीताराम तथा प्रबोधनकार ठाकरे – पत्रकार, समाजसुधारक, लेखक, वक्ते व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७३)
१८८२ : अवंतिकाबाई गोखले – महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व ’हिंद महिला समाज’च्या संस्थापिका (मृत्यू: ? ? १९४९)
१८७९ : पेरीयार ई. व्ही. रामस्वामी – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते (मृत्यू: २४ डिसेंबर १९७३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२ : विश्वनाथ वामन तथा वसंत बापट – कवी व संगीतकार (जन्म: २५ जुलै १९२२)
१९९९ : हसरत जयपुरी – गीतकार (जन्म: १५ एप्रिल १९२२)
१९९४ : व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू (जन्म: २६ जुलै १९५४)
१९३६ : हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ८ आक्टोबर १९५०)
१८७७ : हेन्‍री फॉक्स टॅलबॉट – छायाचित्रणकलेचा पाया घालणारे (जन्म: ११फेब्रुवारी १८००)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 23 January, 2014 1:22