हा या वर्षातील १४७ वा (लीप वर्षातील १४८ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९९ : अमेरिकेचे डिस्कव्हरी हे अंतराळयान नव्या अंतराळस्थानकाकडे झेपावले.
१९९८ : ग्रँड प्रिन्सेस’ या जगातल्या (त्याकाळच्या) सर्वात मोठ्या व सर्वात महागड्या जहाजाने आपल्या पहिल्या सफरीला सुरुवात केली.
१९६४ : गुलजारीलाल नंदा यांनी भारताचे हंगामी पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला.
१९५१ : मुंबई येथे ’तारापोरवाला मत्स्यालय’ सुरू झाले.
१९४१ : दुसरे महायुद्ध – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांनी देशात आणीबाणी जाहीर केली.
१९३० : त्याकाळी सर्वात उंच (३१९ मीटर - १०४६ फूट) असलेल्या ’ख्रायसलर सेंटर’ या इमारतीचे न्यूयॉर्कमधे उद्‍घाटन झाले.
१९०६ : महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना
१८८३ : अलेक्झांडर (तिसरा) रशियाचा झार बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७७ : महेला जयवर्धने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू
१९७५ : मायकेल हसी – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू
१९३८ : डॉ. भालचंद्र वनाजी नेमाडे – कादंबरीकार, कवी, इंग्रजी व मराठी साहित्याचे विलक्षण अभ्यासक व मर्मग्राही समीक्षक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही पदवी देऊन त्यांचा गौरव केला आहे.
१९२३ : हेन्‍री किसिंजर – अमेरिकेचे ५६ वे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते
१९१३ : कृष्णदेव मुळगुंद – चित्रकार व नृत्यदिग्दर्शक (मृत्यू: ११ मे २००४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९८ : मिनोचर रुस्तुम तथा ’मिनू’ मसानी – संसदपटू, अर्थतज्ञ, घटनापंडित व स्वतंत्रता पक्षाचे नेते (जन्म: २० नोव्हेंबर १९०५)
१९९४ : लक्ष्मण बाळाजी तथा तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी – महाराष्ट्रातील प्रबोधन युगाचे एक प्रमुख उद्‍गाते, विचारवंत, संस्कृत पंडित, मराठी विश्वकोशाचे प्रधान संपादक आणि साहित्य संस्कृती मंडळाचे पहिले अध्यक्ष, १९२३ मध्ये कलकत्त्याच्या शासकीय संस्कृत महाविद्यालयातून त्यांनी ’तर्कतीर्थ’ ही पदवी संपादन केली. (जन्म: २७ जानेवारी १९०१)
१९८६ : अरविंद मंगरुळकर – संगीत समीक्षक आणि संस्कृतचे अभ्यासक (जन्म: ? ? ????)
१९६४ : पं. जवाहरलाल नेहरू – भारताचे पहिले पंतप्रधान, भारतरत्‍न [१९५५] (जन्म: १४ नोव्हेंबर १८८९)
१९३५ : रमाबाई भीमराव आंबेडकर – डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्‍नी (जन्म: ? ? १८९६)
१९१० : रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (जन्म: ११ डिसेंबर १८४३)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 3 March, 2014 17:52