हा या वर्षातील १९५ वा (लीप वर्षातील १९६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०१३ : डाक व तार विभागाची १६० वर्षांपासुन सुरू असलेली तार (Telegram) सेवा बंद झाली.
१९७६ : कॅनडात मृत्यूदंडाच्या शिक्षेवर बंदी घालण्यात आली.
१९६९ : अमेरिकेने $500, $1,000, $5,000 व $10,000 च्या नोटा चलनातुन काढुन टाकल्या.
१९६० : चिंपांझींचा अभ्यास करण्यासाठी जेन गुडॉल या टांझानियातील अभयारण्यात दाखल झाल्या. पुढील ४५ वर्षे त्यांनी चिंपांझींमधील कौटुंबिक व सामाजिक संबंध समजून घेण्यासाठी संशोधन केले.
१८६७ : आल्फ्रेड नोबेल यांनी ’डायनामाईट’ या स्फोटकाचे यशस्वी परीक्षण केले.
१७९० : फ्रेन्च राज्यक्रांती – पॅरिसमध्ये नागरिकांनी फ्रेंच राज्यसत्तेचे व दडपशाहीचे चिन्ह असलेल्या बॅस्टिल तुरुंगावर हल्ला केला व आतील सात बंद्यांची मुक्तता केली. या घटनेने फ्रेन्च राज्यक्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६७ : हशन तिलकरत्‍ने – श्रीलंकेचा क्रिकेटपटू व राजकारणी
१९४७ : नवीन रामगुलाम – मॉरिशसचे ३ रे व ६ वे पंतप्रधान
१९२० : शंकरराव चव्हाण – केंद्रीय अर्थमंत्री, गृहमंत्री आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (मृत्यू: २६ फेब्रुवारी २००४)
१९१७ : रोशनलाल नागरथ ऊर्फ ‘रोशन‘ – संगीतकार (मृत्यू: १६ नोव्हेंबर १९६७)
१८८४ : यशवंत खुशाल देशपांडे – महानुभाव वाङमयाचे नामवंत संशोधक, १९३९ मधे झुरिच येथे झालेल्या जागतिक इतिहास परिषदेतील भारताचे प्रतिनिधी (मृत्यू: २० नोव्हेंबर १९७०)
१८५६ : गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ’केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ’सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक (मृत्यू: १७ जून १८९५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : यशवंत विष्णू चंद्रचूड – सर्वोच्‍च न्यायालयाचे १६ वे सरन्यायाधीश (जन्म: १२ जुलै १९२०)
२००३ : प्रो. राजेंद्र सिंग ऊर्फ ’रज्जू भैय्या’ – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ४ थे सरसंघचालक (जन्म: २९ जानेवारी १९२२)
२००३ : लीला चिटणीस – अभिनेत्री (जन्म: ९ सप्टेंबर १९०९)
१९९३ : श्रीमंत विजयमाला राणीसाहेब – करवीर संस्थानच्या महाराणी, खासदार (जन्म: ? ? ????)
१९७५ : मदनमोहन – संगीतकार (जन्म: २५ जून १९२४)
१९६३ : स्वामी शिवानंद सरस्वती – योगी व आध्यात्मिक गुरू (जन्म: ८ सप्टेंबर १८८७)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 24 November, 2013 18:30