हा या वर्षातील २७९ वा (लीप वर्षातील २८० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००७ : जेसन लुइस याने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.
१९८७ : फिजी प्रजासताक बनले.
१९८१ : इजिप्तचे अध्यक्ष अन्वर सादत यांची हत्या
१९७३ : इजिप्त व सीरीयाने मिळुन इस्त्राएलवर हल्‍ला केला.
१९६३ : पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
१९४९ : पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
१९२७ : ’वॉर्नर ब्रदर्स’चा ’जॅझ सिंगर’ हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला.
१९०८ : ऑस्ट्रियाने बोस्‍निया व हेर्झेगोविना हे प्रांत बळकावले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२ : सलील कुलकर्णी – संगीतकार
१९४६ : विनोद खन्ना – अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार
१९४६ : टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (मृत्यू: २९ डिसेंबर २०१२)
१९४३ : डॉ. रत्‍नाकर मंचरकर – संत साहित्याचे गाढे अभ्यासक, साक्षेपी समीक्षक व संशोधक (मृत्यू: २० फेब्रुवारी २०१२)
१९३० : रिची बेनो – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू व समालोचक
१९१४ : थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक (मृत्यू: १८ एप्रिल २००२)
१९१३ : वामन रामराव तथा ’वा. रा.’ कांत – कवी. त्यांची ‘सखी शेजारिणी तू हसत रहा‘, ‘त्यातरुतळी विसरले गीत‘, ‘बगळ्यांची माळ फुले अजुन अंबरात‘, ‘राहिले ओठातल्या ओठात वेडे शब्द माझे‘ इ. भावगीते लोकप्रिय आहेत. १९५२ मध्ये झालेल्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे तसेच १९६२ मधे नांदेड येथे झालेल्या साहित्य संमेलनातील कविसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांचे ‘वेलांटी‘, ‘पहाटतारा‘, ‘शततारका‘, ‘रुद्रवीणा‘, ‘दोनुली‘, 'मरणगंध' इ. काव्यसंग्रह तसेच अनेक ललित, स्फुट व समीक्षणात्मक लेख प्रसिद्ध आहेत. त्यांच्या ’मावळते शब्द’ या कवितेला कवी केशवसुत पारितोषिक मिळाले. (मृत्यू: ८ सप्टेंबर १९९१)
१९१२ : डॉ. हरी जीवन तथा एच. जे. अर्णीकर – अणूरसायनशास्त्रज्ञ, प्राध्यापक (मृत्यू: २२ नोव्हेंबर २०००)
१८९३ : मेघनाद साहा – खगोलभौतिकशास्त्रज्ञ व संसदसदस्य. तार्‍यांच्या वातावरणाचे तापमान आणि आयनीभवन यांचा संबंध स्पष्ट करणारा सिद्धांत त्यांनी मांडला. भारताचे स्वत:चे राष्ट्रीय पंचांग त्यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आले. (मृत्यू: १६ फेब्रुवारी १९५६)
१७७९ : माऊंट स्ट्युअर्ट एल्फिस्टन – स्कॉटिश मुत्सद्दी, हिन्दुस्थानातील मुंबई प्रांताचे गवर्नर, कुशल प्रशासक व इतिहासकार. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले. त्यांनी हिस्ट्री ऑफ इंडिया’ या दोन खंडात भारताचा इतिहास लिहिला. (मृत्यू: २० नोव्हेंबर १८५९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००७ : बाबासाहेब भोसले – महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री [कार्यकाल: २१ जानेवारी १९८२ ते १ फेब्रुवारी १९८३] (जन्म: १५ जानेवारी १९२१)
२००७ : एल. एम. सिंघवी – लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत (जन्म: ९ नोव्हेंबर १९३१)
१९८१ : अन्वर सादात – इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २५ डिसेंबर १९१८)
१९७९ : महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार – इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू [१९६१-१९६४], टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू [१९४८], पद्मविभूषण, मराठी शुद्धलेखन महामंडळाचे अध्यक्ष, प्राचीन मराठी इतिहास आणि मराठ्यांचा इतिहास यांचे व्यासंगी (जन्म: ५ ऑगस्ट १८९०)
१९७४ : व्ही. के. कृष्ण मेनन – भारताचे संरक्षणमंत्री व मुत्सद्दी (जन्म: ३ मे १८९६)
१९५१ : विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (जन्म: ७ एप्रिल १८६०)
१८९२ : लॉर्ड टेनिसन – इंग्लिश कवी (जन्म: ६ ऑगस्ट १८०९)
१६६१ : गुरू हर राय – शिखांचे ७ वे गुरू (जन्म: २६ फेब्रुवारी १६३०)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 18 April, 2014 23:13