हा या वर्षातील ४४ वा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०१० : पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात १७ ठार, ६० जखमी
२००३ : चित्रपट निर्माते, दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान
१९८४ : युरी आन्द्रेपॉव्ह यांच्यानंतर कॉन्स्टान्टीन चेरेनेन्को सोविएत संघाचे अध्यक्ष झाले.
१७३९ : कर्नालची लढाई – पर्शियाच्या नादिरशहाने मुघलांच्या मुहम्मदशहावर तीन तासांत विजय मिळवला. या विजयामुळे नादिरशहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला.
१६६८ : स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली.
१६३० : आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुर्‍हाणपूर येथे पोहोचला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५ : विनोद मेहरा – अभिनेता (मृत्यू: ३० आक्टोबर १९९०)
१९११ : फैज अहमद फैज – लेनिन शांतता पुरस्कार विजेते ऊर्दू शायर (मृत्यू: २० नोव्हेंबर १९८४)
१९१० : दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (मृत्यू: १ मार्च १९९९)
१८९४ : वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेन्द्रे – इतिहासकार (मृत्यू: १६ जुलै १९८६)
१८७९ : सरोजिनी नायडू – प्रभावी वक्त्या, कवयित्री व स्वातंत्र्यसेनानी, रौलेट कायदा, मॉन्टेग्यू - चेम्सफर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यांत त्यांचा सक्रिय सहभाग होता. (मृत्यू: २ मार्च १९४९)
१८७६ : देबुजी झिंगराजी जानोरकर ऊर्फ ’संत गाडगे महाराज’ – कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष सेवेचे व्रत घेतले आणि त्यासाठी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. (मृत्यू: २० डिसेंबर १९५६)
१८३५ : मिर्झा गुलाम अहमद – अहमदिया पंथाचे संस्थापक (मृत्यू: २६ मे १९०८)
१७६६ : थॉमस माल्थस – प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ (मृत्यू: २३ डिसेंबर १८३४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : अखलाक मुहम्मद खान उर्फ कवी शहरयार – ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ऊर्दू कवी (जन्म: १६ जून १९३६)
२००८ : राजेन्द्र नाथ – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील विनोदी अभिनेते (जन्म: ? ? १९३१)
१९७४ : ’सूर रंग’ उस्ताद अमीर खॉं – इंदौर घराण्याचे संस्थापक व गायक (जन्म: १५ ऑगस्ट १९१२)
१९६८ : गोपाळकृष्ण भोबे – संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक (जन्म: ? ? ????)
१९०१ : लक्ष्मण बापूजी ऊर्फ ’भाऊराव’ कोल्हटकर – गायक नट (जन्म: ९ मार्च १८६३)
१८८३ : रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक (जन्म: २२ मे १८१३)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 13 February, 2015 1:03