हा या वर्षातील ३३९ वा (लीप वर्षातील ३४० वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९५७ : इंडोनेशियाचे अध्यक्ष सुकार्नो यांनी सर्व डच नागरिकांना हद्दपार केले.
१९३२ : जर्मनीत जन्मलेले स्विस भौतिकशास्त्रज अल्बर्ट आईनस्टाईन यांना अमेरिकन व्हिसा देण्यात आला.
१८४८ : अमेरिकन संसदेसमोर केलेल्या भाषणात राष्ट्राध्यक्ष जेम्स पोल्क यांनी कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणात सोने सापडल्याचे सांगितले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४३ : लक्ष्मण देशपांडे – ’वर्‍हाड निघालंय लंडनला’ साठी प्रसिद्ध असलेले लेखक, दिग्दर्शक व प्राध्यापक
(मृत्यू: २२ फेब्रुवारी २००९)
१९३१ : अ‍ॅडमिरल जयंत नाडकर्णी – १४ वे नौसेनाप्रमुख
१९२७ : भुमिबोल अदुल्यतेज ऊर्फ राम (नववा) – थायलँडचा राजा
१९०५ : शेख अब्दुल्ला – शेर - ए - कश्मीर
(मृत्यू: ८ सप्टेंबर १९८२)
१९०१ : वेर्नर हायसेनबर्ग – ‘क्‍वांटम मॅकॅनिक्स‘मधील मूलभूत संशोधनासाठी नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९३२) जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: १ फेब्रुवारी १९७६)
१९०१ : वॉल्ट इलायन डिस्‍ने – अ‍ॅनिमेशनपटांचे प्रणेते, ‘मिकी माऊस’चे जनक (मृत्यू: १५ डिसेंबर १९६६)
१८९४ : जोश मलिहाबादी – ऊर्दू कवी
(मृत्यू: २२ फेब्रुवारी १९८२)
१८६३ : पॉल पेनलीव्ह – फ्रान्सचे पंतप्रधान आणि गणितज्ञ
(मृत्यू: २९ आक्टोबर १९३३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१६ : जे. जयललिता – तामिळनाडूच्या मुख्यमंत्री, एआयएडीएमके या राजकीय पक्षाच्या नेत्या, प्रसिद्ध अभिनेत्री
(जन्म: २४ फेब्रुवारी १९४८)
२००७ : म. वा. धोंड – टीकाकार
(जन्म: ३ आक्टोबर १९१४)
१९९९ : वसंत गणेश तथा बापूसाहेब उपाध्ये – स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी नेते, आमदार आणि शेती व सिंचन या विषयांतील व्यासंगी मार्गदर्शक
(जन्म: ? ? ????)
१९९१ : डॉ. वासुदेव विश्वनाथ गोखले – संस्कृततज्ञ आणि बौद्ध धर्माचे अभ्यासक
(जन्म: ? ? ????)
१९७३ : राकेश मोहन – हिन्दी नाटककार
(जन्म: ८ जानेवारी १९२५)
१९५९ : कुमार श्री दुलीपसिंहजी – इंग्लंडचे क्रिकेटपटू, यांच्या स्मरणार्थ भारतात ‘दुलीप ट्रॉफी’ खेळली जाते.
(जन्म: १३ जून १९०५ - नवानगर, काठियावाड, गुजराथ)
१९५१ : अवनींद्रनाथ टागोर – जलरंगचित्रकार
(जन्म: ७ ऑगस्ट १८७१)
१९५० : योगी अरविंद घोष – क्रांतिकारक, तत्त्वचिंतक, योगी व कवी
(जन्म: १५ ऑगस्ट १८७२ - कलकत्ता, पश्चिम बंगाल)
१७९१ : वूल्फगँग मोझार्ट – ऑस्ट्रियन संगीतकार
(जन्म: २७ जानेवारी १७५६)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 15 January, 2014 13:31