हा या वर्षातील २३२ वा (लीप वर्षातील २३३ वा) दिवस आहे.

       लहान कीटक खाण्याच्या सवयीमुळे डासांच्या निर्मूलनासाठी उपयुक्त ठरलेला गप्पी मासा हा गोड्या पाण्यातील सध्याचा सर्वात लोकप्रिय मासा असावा. १८६६ मध्ये हा त्रिनिदाद मधील टोबॅगो बेटावर हा शोधला गेला. या माशाला ’गप्पी’ हे नाव पडले ते त्याच्या आर. जे. एल. गप्पी या संशोधकामुळे! गप्पी मासा

महत्त्वाच्या घटना:

२००८ : भारताचा कुस्तीगीर सुशीलकुमार याला बिंजिंग ऑलिंपिकमध्ये ब्राँझ पदक मिळाले.
१९८८ : इराण इराक युद्ध – सुमारे ८ वर्षांच्या युद्धानंतर युद्धबंदी करार झाला.
१९६० : सेनेगलने आपण (मालीपासुन) स्वतंत्र असल्याचे जाहीर केले.
१९४१ : दुसरे महायुद्ध – फ्रान्समधील भुमिगत चळवळ उखडून काढण्याच्या उद्देशाने जर्मनांनी एका दिवसात ५० हजार नागरिकांना अटक केली. यातल्या ज्यूंना छळ छावण्यात रवाना करण्यात आले.
१९२० : डेट्रॉइट, मिशिगन येथे जगातील पहिले व्यावसायिक नभोवाणी केंद्र 8MK (सध्याचे WWJ) सुरू झाले.
१९१४ : पहिले महायुद्ध – जर्मन फौजांनी ब्रुसेल्स शहराचा ताबा घेतला.
१८९७ : सर रोनाल्ड रॉस यांनी (भारतात) हिवतापाच्या जीवाणूचा शोध लावला. आल्मोडा येथे मलेरियावर केलेल्या संशोधनासाठी त्यांना १९०२ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला.
१८२८ : राजा राम मोहन रॉय यांनी महाराजा द्वारकानाथ टागोर (ठाकूर), कालिनाथ रॉय आणि मथुरानाथ मलिक या तीन मित्रांच्या साहाय्याने कोलकाता यथे ब्राम्हो सभेची स्थापना केली. या सभेलाच पुढे ’ब्राम्हो समाज’ म्हणू लागले.
१६६६ : शिवाजीराजांनी दख्खनेमधे येण्यासाठी ’नरवीर घाटी’ हे ठाणे खोटे दस्तऐवज दाखवून ओलांडले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४६ : एन. आर. नारायण मूर्ती – ’इन्फोसिस’चे सहसंस्थापक
१९४४ : राजीव गांधी – भारताचे ६ वे पंतप्रधान, भारतरत्‍न (१९९१) मरणोत्तर (मृत्यू: २१ मे १९९१)
१९४१ : स्लोबोदान मिलोसोव्हिच – सर्बिया व युगोस्लाव्हियाचे अध्यक्ष (मृत्यू: ११ मार्च २००६)
१८३३ : बेंजामिन हॅरिसन – अमेरिकेचे ३३वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १३ मार्च १९०१)
१७७९ : जेकब बर्झेलिअस – स्वीडीश रसायनशास्त्रज्ञ (मृत्यू: ७ ऑगस्ट १८४८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, थोर समाजवादी विचारवंत व साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेन्द्र दाभोळकर यांची पुणे येथे गोळ्या घालुन हत्या (जन्म: ? ? ????)
२०१३ : जयंत साळगावकर – ज्योतिर्भास्कर, लेखक व उद्योजक (जन्म: १ फेब्रुवारी १९२९)
२००१ : मधुकर रामराव तथा एम. आर. यार्दी – प्राच्यविद्येचे गाढे अभ्यासक, केंद्रीय वित्त सचिव, भारतीय विद्या भवनच्या पुणे केंद्राचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
२००० : प्राणलाल मेहता – चित्रपट निर्माते (किनारा, किताब, बेजुबान, मरते दम तक, पुलिस पब्लिक) (जन्म: ? ? ????)
१९९७ : प्रागजी डोस्सा – गुजराथी नाटककार व लेखक, नेहरू पुरस्कार व साहित्य अकादमी पुरस्कार विजेते (जन्म: ७ आक्टोबर १९०७)
१९८८ : माधवराव शिंदे – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व संकलक. ’कन्यादान’, ’धर्मकन्या’ या त्यांच्या चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर ’शिकलेली बायको’ या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. याशिवाय त्यांचे मायेचा पाझर, संसार [उर्मिला मातोंडकरचा पहिला चित्रपट] हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. (जन्म: ? ? ????)
१९८५ : अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल यांची शेरपूर येथे एका गुरूद्वारात गोळ्या घालुन हत्या करण्यात आली. (जन्म: २ जानेवारी १९३२)
१९८४ : रघुवीर भोपळे ऊर्फ ’जादूगार रघुवीर’ – आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जादूगार. त्यांनी ‘फिरता जादूगार‘ व ‘मी पाहिलेला रशिया‘ ही पुस्तके लिहिली आहेत. (जन्म: २४ मे १९२४)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 2 March, 2014 23:30