हा या वर्षातील २२ वा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : ’आय. एन. एस. मुंबई’ ही क्षेपणास्त्रवाहू नौका भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल झाली.
१९९९ : ऑस्ट्रेलियन धर्मप्रसारक ग्रॅहॅम स्टेन्स व त्याच्या दोन मुलांची ओरिसाच्या केओंझार जिल्ह्यातील मनोहरपूर येथे मोटारीत जाळून हत्या करण्यात आली.
१९७१ : सर्व मित्र सिकरी यांनी भारताचे १३ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
१९४७ : भारतीय घटनेची रुपरेषा कशी असावी याविषयीचा ठराव घटना समितीत मंजूर
१९२४ : रॅम्से मॅकडोनाल्ड इंग्लंडचे पंतप्रधान बनले. ब्रिटनमधे मजूरपक्ष प्रथमच सत्तेवर आला.
१९०१ : राणी व्हिक्टोरियाच्या निधनानंतर ७ वा एडवर्ड हा इंग्लंडचा राजा झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३४ : विजय आनंद – हिन्दी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक (मृत्यू: २३ फेब्रुवारी २००४)
१९२० : प्रा. ह. श्री. शेणोलीकर – संतसाहित्याचे अभ्यासक (मृत्यू: ? ? ????)
१९१६ : सत्येन बोस – बंगाली व हिन्दी चित्रपट दिग्दर्शक व पटकथालेखक, चलती का नाम गाडी [१९५८], दोस्ती [१९६४], रात और दिन [१९६७], आंसू बन गये फूल [१९६९], जीवन मृत्यू [१९७०] हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट आहेत. (मृत्यू: ९ जून १९९३)
१९१६ : हरिलाल उपाध्याय – गुजराथी लेखक, कवी व ज्योतिषी (मृत्यू: १५ जानेवारी १९९४)
१९०९ : यू. थांट – संयुक्त राष्ट्रांचे तिसरे सरचिटणीस (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९७४)
१५६१ : सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी (मृत्यू: ९ एप्रिल १६२६)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९७८ : हर्बर्ट सटक्लिफ – इंग्लिश क्रिकेटपटू (जन्म: २४ नोव्हेंबर १८९४)
१९७५ : ’काव्यविहारी’ धोंडो वासुदेव गद्रे – केशवसुत संप्रदायी आधुनिक कवी (जन्म: १६ नोव्हेंबर १८९४)
१९७३ : लिंडन बी. जॉन्सन – अमेरिकेचे ३६ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: २७ ऑगस्ट १९०८)
१९७२ : स्वामी रामानंद तीर्थ – हैदराबाद संस्थानातील स्वातंत्र्य चळवळीचे नेते, समाजसुधारक आणि शिक्षण तज्ञ (जन्म: ३ आक्टोबर १९०३)
१९६७ : डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि ’गदर पार्टी’ चे शिल्पकार (जन्म: ७ नोव्हेंबर १८८४)
१९०१ : व्हिक्टोरिया – इंग्लंडची राणी, हिने ६३ वर्षे आणि २१६ दिवस इंग्लंडवर राज्य केले. हिच्या कारकिर्दीत इंग्लंडच्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसे अशी ख्याती होती. व्हिक्टोरिया राणीच्या काळातच भारत इंग्लंडचा गुलाम झाला. (जन्म: २४ मे १८१९)
१७९९ : होरॅस बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
१६८२ : समर्थ रामदास स्वामी (जन्म: ? ? १६०८)
१६६६ : ५ वा मुघल सम्राट शहाजहान याचे आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) कैदेत १० वर्षे राहिल्यानंतर निधन (जन्म: ५ जानेवारी १५९२)
१२९७ : योगी चांगदेव समाधिस्थ (जन्म: ? ? ????)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 16 October, 2014 13:26