हा या वर्षातील १९० वा (लीप वर्षातील १९१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : अमेरिकेच्या पीट सॅम्प्रसने ऑस्ट्रेलियाच्या पॅट्रिक राफ्टरचे आव्हान मोडून काढीत विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकली. त्याबरोबरच सॅम्प्रसने आपल्या कारकिर्दीतील तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.
१९६९ : वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.
१८९३ : डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ’ओपन हार्ट’ शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.
१८७४ : इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८ : हरी जरीवाला ऊर्फ ’संजीव कुमार’ – रुपेरी चित्रसृष्टी निखळ अभिनयाच्या जोरावर गाजवणारे कसदार अभिनेते (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९८५)
१९२५ : वसंतकुमार शिवशंकर पदुकोण ऊर्फ ’गुरू दत्त’ – प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते. त्यांचे ‘चौदहवी का चांद‘, ‘कागज के फूल‘, ‘सीआयडी‘, ‘मि. अंड मिसेस ५५‘, ‘आरपार‘ आणि ‘प्यासा‘ इ. चित्रपट लोकप्रिय ठरले. त्यांच्या ‘साहिब बिबी और गुलाम‘ या चित्रपटाला राष्ट्रपतीपदक मिळाले. (मृत्यू: १० आक्टोबर १९६४)
१९२१ : रामभाऊ म्हाळगी – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, जनसंघ या राजकीय पक्षाचे महाराष्ट्राचे पहिले सरचिटणीस आणि विधानसभेतील पहिले आमदार, तसेच भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राचे पहिले प्रादेशिक अध्यक्ष (मृत्यू: ६ मार्च १९८२)
१८१९ : एलियास होवे – शिवणयंत्राचा संशोधक (मृत्यू: ३ आक्टोबर १८६७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५ : डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (जन्म: ५ एप्रिल १९२०)
१९९३ : संगीतकार व वाद्यवृंद संयोजक या सोनिक-ओमी (काका-पुतणे) जोडीतील सोनिक यांचे निधन (जन्म: ? ? ????)
१९६८ : ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (जन्म: २० एप्रिल १८९६)
१९३२ : किंग कँप जिलेट – अमेरिकन संशोधक व उद्योजक (जन्म: ५ जानेवारी १८५५)
१८५६ : अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो – इटालियन रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ९ ऑगस्ट १७७६)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 3 March, 2014 18:40