हा या वर्षातील २९७ वा (लीप वर्षातील २९८ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना केन्द्र सरकारचा ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ जाहीर झाला. ६ डिसेंबर २००० रोजी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
१९९७ : सतारवादक पंडित रविशंकर यांना संगीतक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जपानचा ’प्रिमियम इंपिरिअल आंतरराष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
१९८४ : भारतामधे प्रथमच भुयारी रेल्वे कोलकाता येथे सुरू झाली.
१९७२ : दुष्काळग्रस्त गुरे वाचवण्यासाठी ’सकाळ रिलीफ फंड’ या संस्थेतर्फे ’दत्तक बैल योजना’ सुरू करण्यात आली.
१९६४ : उत्तर र्‍होडेशियाला (युनायटेड किंगडमपासुन) स्वातंत्र्य मिळाले व त्याचे झांबिया असे नामकरण करण्यात आले.
१९६३ : देशात असलेल्या दुष्काळामुळे सार्वजनिक व मोठया समारंभात तांदळाच्या पदार्थावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली.
१९४५ : संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
१९०९ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी बॅ. गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लंडनमध्ये प्रथमच दसर्‍याचा उत्सव साजरा केला.
१६०५ : मुघल सम्राट जहांगिरने आग्र्याची गादी सांभाळली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७२? : रीमा लांबा ऊर्फ ’मल्लिका शेरावत’ – अभिनेत्री व मॉडेल
१९२६ : केदारनाथ सहानी – सिक्कीमचे राज्यपाल, दिल्लीचे महापौर (मृत्यू: ३ आक्टोबर २०१२)
१९२१ : रासीपुरम कृष्णस्वामी तथा आर. के. लक्ष्मण – व्यंगचित्रकार, पद्मभूषण (१९७१), रॅमन मॅगसेसे (१९८४), पद्मविभूषण (२००५) इत्यादि पुरस्कारांचे मानकरी (मृत्यू: २६ जानेवारी २०१५)
१९१४ : लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन (मृत्यू: २३ जुलै २०१२)
१९१० : ’लीला’ ऊर्फ माई भालजी पेंढारकर – मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री (मृत्यू: ? ? ????)
१८६८ : भवानराव श्रीनिवासराव तथा ’बाळासाहेब’ पंतप्रतिनिधी – औंध संस्थानचे अधिपती, चित्रकार, कीर्तनकार तसेच व्यायामविषयक पुस्तकांचे कर्ते (मृत्यू: १३ एप्रिल १९५१)
१७७५ : बहादूरशहा जफर – दिल्लीचा शेवटचा बादशहा (मृत्यू: ७ नोव्हेंबर १८६२)
१६३२ : अँथनी व्हॉन लीवेनहॉक – डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (मृत्यू: २६ ऑगस्ट १७२३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : प्रबोधचंद्र तथा मन्ना डे – पार्श्वगायक. ’सीमा’, ’बरसात कीरात’, ’दो बिघा जमीन’, देख कबीरा रोया’ आदी चित्रपटांतील त्यांची गाणी गाजली होती. (जन्म: १ मे १९१९)
१९९५ : माधवराव साने – पत्रकार, भारतीय श्रमिक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष (जन्म: ? ? ????)
१९९२ : अरविंद गोखले – मराठी नवकथेचे जनक, ’गंधवार्ता’ या त्यांच्या कथेला आशियाई-अरबी-अफ्रिकी कथा स्पर्धेचे पहिले पारितोषिक मिळाले. भारतीय उपखंडातील प्रसिद्ध लेखकांच्या लघुकथांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना १९८४ मधे केंद्र सरकारची फेलोशिप मिळाली होती. (जन्म: १९ फेब्रुवारी १९१९)
१९९१ : इस्मत चुगताई – ऊर्दू कथा व पटकथा लेखिका (जन्म: १५ ऑगस्ट १९१५)
१६०१ : टायको ब्राहे – डच खगोलशास्त्रज्ञ, खगोलशास्त्रावर मूलभूत संशोधन केले. (जन्म: १४ डिसेंबर १५४६)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Monday, 26 January, 2015 22:57