-: दिनविशेष :-

८ ऑक्टोबर

भारतीय वायू सेना दिवस


महत्त्वाच्या घटना:

२००१

११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेत झालेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.

१९८२

पोलंडने ‘सॉलिडॅरिटी’ व इतर सर्व कामगार संघटनांवर बंदी घातली.

१९६२

अल्जीरीयाचा संयुक्त राष्ट्रांत प्रवेश

१९६२

‘नाट्य निकेतन’ निर्मित, आचार्य अत्रे लिखित व प्रभाकर पणशीकर दिग्दर्शित ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा पहिला प्रयोग दिल्ली येथील आयफॅक्स थिएटर येथे झाला.

१९५९

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय ‘डी-लिट’ पदवी घरी येऊन दिली.

१९३९

दुसरे महायुद्ध – जर्मनीने पोलंडचा पश्चिम भाग ताब्यात घेतला.

१९३२

‘इंडियन एअर फोर्स अ‍ॅक्ट’ द्वारे भारतीय वायूदलाची स्थापना झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५०

ओम पुरी – अभिनेता
(मृत्यू: ६ जानेवारी २०१७)

१९२८

नील हार्वे

नील हार्वे – ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू, एक उत्कृष्ट डावखुरा फलंदाज

(Image Credit: Cricket Country)

१९२६

राजकुमार

कुलभूषण पंडित तथा ‘राजकुमार’ ऊर्फ ‘जानी’ – जबरदस्त आवाजाने संवादफेक करून प्रेक्षकांना खूष करणारा हिन्दी चित्रपट अभिनेता
(मृत्यू: ३ जुलै १९९६)

(Image Credit: पत्रिका)

१९२२

डॉ. जी. एन. रामचंद्रन

गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले.
(मृत्यू: ७ एप्रिल २००१ - चेन्नई, तामिळनाडू)

(Image Credit: Alchetron)

१८९१

शंकर वासुदेव किर्लोस्कर

शंकर वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची (Kirloskar Press) स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ‘शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे.
(मृत्यू: १ जानेवारी १९७५)

(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)

१८५०

हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर

हेन्‍री लुईस ली चॅटॅलिअर – फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ
(मृत्यू: १७ सप्टेंबर १९३६)

(Image Credit: Wikipedia)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२०

राम विलास पासवान

राम विलास पासवान – केंद्रीय मंत्री, लोकसभा खासदार (९ वेळा), राज्यसभा खासदार आणि लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष
(जन्म: ५ जुलै १९४६ - खगरिया, बिहार)

(Image Credit: Wikipedia)

२०१२

नवल किशोर शर्मा

नवल किशोर शर्मा – केन्द्रीय मंत्री व गुजरातचे राज्यपाल
(जन्म: ५ जुलै १९२५)

(Image Credit: पत्रिका)

२०१२

वर्षा भोसले

वर्षा भोसले – पत्रकार व पार्श्वगायिका, आशा भोसले यांची कन्या
(जन्म: ?? १९५६ - नागपूर)

(Image Credit: Celebrity Born)

१९९८

इंदिराबाई हळबे

इंदिराबाई हळबे ऊर्फ ‘मावशी’ – देवरुख येथील ‘मातृमंदिर’ संस्थेच्या संस्थापिका, कोकणच्या मदर तेरेसा
(जन्म: ? ? ????)

(Image Credit: साप्ताहिक साधना)

१९९६

गोदावरी परुळेकर – मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका. महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्‍यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ‘जेव्हा माणूस जागा होतो‘ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे.
(जन्म: १४ ऑगस्ट १९०७)

१९७९

जयप्रकाश नारायण

‘लोकनायक’ जयप्रकाश नारायण – स्वातंत्र्यसैनिक व सर्वोदयी नेते आणि आणीबाणीविरोधी लढ्याचे प्रेरणास्थान. रॅमन मॅगसेसे पारितोषिक (१९६५), भारतरत्न (१९९९ - मरणोत्तर)
(जन्म: ११ आक्टोबर १९०२)

(Image Credit: News Bharati)

१९७९

नूर मोहम्मद तराकी
१९७८ मधील छायाचित्र

नूर मोहम्मद तराकी – अफगणिस्तानचे तिसरे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: १४ जुलै १९१७)

(Image Credit: Wikipedia)

१९६७

क्लेमंट अ‍ॅटली

क्लेमंट रिचर्ड अ‍ॅटली – इंग्लंडचे पंतप्रधान
(जन्म: ३ जानेवारी १८८३)

(Image Credit: Britannica)

१९३६

धनपतराय श्रीवास्तव ऊर्फ ‘मुन्शी प्रेमचंद’ – हिन्दी साहित्यिक. त्यांनी १५ कादंबर्‍या व ३०० कथा लिहील्या. त्यांचे २४ कथासंग्रह प्रसिद्ध झाले.
(जन्म: ३१ जुलै १८८०)

१८८८

महादेव मोरेश्वर कुंटे – कवी व संस्कृतचे प्राध्यापक. ‘राजा शिवाजी’ हे त्यांचे काव्य विशेष गाजले.
(जन्म: १ ऑगस्ट १८३५ - माहुली, सांगली, महाराष्ट्र)

१३१७

फुशिमी – जपानचा सम्राट
(जन्म: १० मे १२६५)



Pageviews

This page was last modified on 16 October 2021 at 10:38pm