हा या वर्षातील ३६३ वा (लीप वर्षातील ३६४ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९५९ : नोबेल पारितोषिक विजेते रिचर्ड फाइनमॅन यांनी CALTECH येथे There is plenty of room at the bottom हे प्रसिद्ध भाषण दिले. ही nanotechnology ची सुरुवात मानली जाते.
१९५९ : पोर्तुगालमधील लिस्बन येथे भुयारी रेल्वेची सुरूवात झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४२ : राजेश खन्ना – चित्रपट अभिनेते, निर्माते आणि राज्यसभेचे सदस्य (मृत्यू: १८ जुलै २०१२)
१९१७ : रामानंद सागर – हिन्दी चित्रपट निर्माते (मृत्यू: १२ डिसेंबर २००५)
१९०४ : कुपल्ली वेंकटप्पागौडा पुट्टप्पा उर्फ ’कुवेम्पू’ – ज्ञानपीठ विजेते कन्नड लेखक व कवी (मृत्यू: ११ नोव्हेंबर १९९४)
१९०० : मास्टर दीनानाथ मंगेशकर – शास्त्रीय व नाट्यसंगीत गायक व अभिनेते (मृत्यू: २४ एप्रिल १९४२)
१८०८ : अँड्र्यू जॉन्सन – अमेरिकेचे १७ वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ३१ जुलै १८७५)
१८०० : चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (मृत्यू: १ जुलै १८६०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२ : टोनी ग्रेग – इंग्लिश क्रिकेटपटू व समालोचक (जन्म: ६ आक्टोबर १९४६)
१९८६ : हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान (जन्म: १० फेब्रुवारी १८९४)
१९६७ : पण्डित ओंकारनाथ ठाकूर ऊर्फ ’प्रणव रंग’ – गायक व संगीत अभ्यासक, १९५५ मधे पद्मश्री पुरस्काराने सन्मानित (जन्म: २४ जून १८९७)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 2 January, 2014 14:46