-: दिनविशेष :-

१० फेब्रुवारी

आज संगणकाची जगातील बाजारपेठ फारच प्रचंड आहे. संगणकाच्या खरेदी-विक्रीत अब्जावधी डॉलर्सची उलाढाल करणार्‍या आय. बी. एम. या जगप्रसिद्ध कंपनीचे १९४३ मधे असलेले अध्यक्ष थॉमस वॉटसन हे मात्र संगणक उद्योगाबाबत प्रारंभी साशंक होते. जगात जास्तीत जास्त पाच संगणक खपतील असे मला वाटते असे ते म्हणाले होते.

महत्त्वाच्या घटना:

२००५

उत्तर कोरियाने आपण अण्वस्त्रसज्ज असल्याचे जाहीर केले.

१९९६

आय. बी. एम. (IBM) कंपनीने बनवलेल्या "डीप ब्लू" या महासंगणकाने बुद्धीबळात गॅरी कास्पारॉव्हचा पराभव केला.

१९४९

गांधी-वध अभियोगातून स्वातंत्र्यवीर सावरकर यांची निष्कलंक सुटका झाली.

१९४८

पुणे विद्यापीठ

पुणे विद्यापीठाची स्थापना

१९३३

न्यूयॉर्कमध्ये झालेल्या एका मुष्टियुद्ध लढतीत प्रिमो कार्नेरा याने अर्नी शाफ याचा १३ व्या फेरीत पराभव केला. या लढतीत अर्नी शाफचा मृत्यू झाला.

१९२९

जे. आर. डी टाटा हे पहिले अधिकृत भारतीय वैमानिक बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४५

राजेश पायलट – केंद्रीय मंत्री
(मृत्यू: ११ जून २०००)

१९१०

दुर्गा भागवत – साहित्यिका व मानववंशशास्त्रज्ञ
(मृत्यू: ७ मे २००२)

१८९४

हॅरॉल्ड मॅकमिलन – इंग्लंडचे पंतप्रधान
(मृत्यू: २९ डिसेंबर १९८६)

१८०३

जगन्नाथ ऊर्फ ‘नाना’ शंकरशेठ – दानशूर व शिक्षणतज्ञ
(मृत्यू: ३१ जुलै १८६५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: १५ जुलै १९०४)

१९८२

नरहर कुरुंदकर – विद्वान, टीकाकार आणि लेखक
(जन्म: १५ जुलै १९३२)

१९२३

विलहेम राँटजेन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: २७ मार्च १८४५)

१९१२

सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद
(जन्म: ५ एप्रिल १८२७)

१८६५

हेन्‍रिक लेन्झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १२ फेब्रुवारी १८०४)



Pageviews

This page was last modified on 07 May 2021 at 11:25am