-: दिनविशेष :-

दिवसमहिना

जागतिक ओझोन संरक्षण दिनEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

१९९७

संस्कृत भाषेसंदर्भात प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल मुंबई येथील मराठा मंदिर संस्थेच्या वरळी हायस्कूलमधील संस्कृतचे निवृत्त शिक्षक पं. गुलाम दस्तगीर अब्बासअली बिराजदार यांना ’राष्ट्रीय संस्कृत पंडित’ हा राष्ट्रपतींकडून दिला जाणारा पुरस्कार जाहीर

१९९७

आय. टी. सी. आंतरराष्ट्रीय मैदानी स्पर्धेत राजीव बालकृष्णन याने शंभर मीटर धावण्याच्या शर्यतीत १०.५० सेकंद वेळ नोंदवून राष्ट्रीय विक्रम केला.

१९७५

पापुआ न्यू गिनी या देशाला (ऑस्ट्रेलियापासुन) स्वातंत्र्य मिळाले.

१९४५

दुसरे महायुद्ध – हाँगकाँगमधील जपानी सैन्याने रॉयल नेव्हीसमोर शरणागती पत्करली

१९३५

इंडियन कंपनीज अ‍ॅक्ट अन्वये ‘बँक ऑफ महाराष्ट्र’ची नोंदणी करण्यात आली.

१९०८

‘जनरल मोटर्स कॉर्पोरेशन’ या कंपनीची स्थापना झाली.

१६२०

‘मेफ्लॉवर’ जहाजाने इंग्लंडमधील साउदॅम्पटन बंदरातुन उत्तर अमेरिकेकडे प्रयाण केले.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६

डेव्हिड कॉपरफिल्ड
२०१० मधील छायाचित्र

डेव्हिड सेथ कोटकिन तथा ‘डेव्हिड कॉपरफिल्ड’ – अमेरिकन जादूगार व दृष्टीविभ्रमकार

(Image Credit: विकिपीडिया)

१९५४

संजय बंदोपाध्याय – सतारवादक

१९४२

नामदेव धोंडो तथा ‘ना. धों’ महानोर – निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी, त्यांना ‘पानझड’ या कवितासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. १९ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

१९१६

एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका
(मृत्यू: ११ डिसेंबर २००४)

१९१३

कमलाबाई ओगले

कमलाबाई कृष्णाजी ओगले – ‘रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका
(मृत्यू: २० एप्रिल १९९९)

(Image Credit: Bytes of India)

१९०७

वामनराव सडोलीकर – जयपूर-अत्रौली घराण्याचे गायक
(मृत्यू: २५ मार्च १९९१)

१३८६

हेन्‍री (पाचवा) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ३१ ऑगस्ट १४२२)

१३८०

चार्ल्स (सहावा) – फ्रान्सचा राजा
(मृत्यू: २१ आक्टोबर १४२२)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४

जयवंत दळवी – साहित्यिक, नाटककार व पत्रकार. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, विनोदी लेख असे विविध प्रकार त्यांनी हाताळले. ते ‘ठणठणपाळ’ या टोपणनावाने विनोदी व मार्मिक लेखन करीत.
(जन्म: १४ ऑगस्ट १९२५)

१९७७

केसरबाई केरकर – जयपूर - अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका
(जन्म: १३ जुलै १८९२)

१९७३

पुण्यातील जुन्या पिढीतील सरदार, पर्वती संस्थानचे विश्वस्त, संगीतज्ञ, इतिहासाचे अभ्यासक गंगाधरराव नारायणराव तथा आबासाहेब मुजुमदार यांचे निधन. त्यांचे मूळ नाव श्रीधर पांडुरंग प्रभुणे होते. मुजुमदारांकडे ते दत्तक गेले. पुण्याच्या भारत इतिहास संशोधक मंडळाचे ते चोवीस वर्षे चिटणीस होते.

१९६५

फ्रेड क्‍विम्बी – अमेरिकन अ‍ॅनिमेशनपट निर्माते
(जन्म: ३१ जुलै १८८६)

१९३२

सर रोनाल्ड रॉस – हिवतापाच्या जंतुंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे (१९०२) ब्रिटिश डॉक्टर
(जन्म: १३ मे १८५७ - आल्मोडा, उत्तराखंड)

१८२४

लुई (अठरावा) – फ्रान्सचा राजा
(जन्म: १७ नोव्हेंबर १७५५)

१७३६

डॅनियल फॅरनहाइट – जर्मन शास्त्रज्ञ
(जन्म: २४ मे १६८६)


Pageviews

This page was last modified on 12 May 2021 at 11:38pm