हा या वर्षातील १५०वा (लीप वर्षातील १५१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९३ : पु. ल. देशपांडे यांना ’त्रिदल’ संस्थेच्या वतीने ’पुण्यभूषण पुरस्कार’ प्रदान
१९८७ : गोव्याला राज्याचा दर्जा देण्यात आला.
१९७४ : एअरबस ए-३०० विमानांची सेवा सुरू झाली.
१९४२ : दुसरे महायुद्ध – इंग्लंडच्या १००० विमानांनी जर्मनीतील कोलोन शहरावर तुफानी बॉम्बहल्ला केला.
१९३४ : मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात
१५७४ : हेन्‍री (तिसरा) फ्रान्सचा राजा बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५० : परेश रावळ – अभिनेता
१९४९ : बॉब विलीस – इंग्लिश जलदगती गोलंदाज
१९१६ : दीनानाथ दलाल – अत्यंत लोकप्रिय व प्रतिभावान चित्रकार  (मृत्यू: १५ जानेवारी १९७१ - मुंबई)
१८९४ : डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर – इतिहासकार (मृत्यू: १० जुलै १९६९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८९ : दर्शनसिंहजी महाराज – शिख संतकवी, ’मंजील-ए-नूर’ आणि ’मता-ए-नूर’ या ऊर्दू कवितासंग्रहांबद्दल त्यांना ऊद्रू अकादमीचे पुरस्कार मिळाले. (जन्म: १४ सप्टेंबर १९२१)
१९८१ : बांगलादेशचे ७ वे राष्ट्राध्यक्ष झिया उर रहमान यांची हत्या (जन्म: १९ जानेवारी १९३६)
१९६८ : सावळाराम लक्ष्मण हळदणकर – चित्रकार (जन्म: २५ नोव्हेंबर १८८२)
१९५५ : नारायण मल्हार जोशी – भारतातील संघटित कामगार चळवळीचे जनक (जन्म: ५ जून १८७९)
१९५० : दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर – प्राच्यविद्या संशोधक, विदीशाजवळील वीसनगर येथील उत्खनन आणि त्यात सापडलेला ’खाम बाबा पिलर’ हा स्तंभ हे त्यांचे एक प्रमुख संशोधन (जन्म: ? ? १८७५)
१९४१ : प्रजाधिपोक ऊर्फ राम (सातवा) – थायलँडचा राजा (जन्म: ८ नोव्हेंबर १८९३)
१९१२ : विल्बर राईट – आपला भाऊ ऑर्व्हिल राईट याच्यासह इंजिनाच्या विमानाचा शोध लावणारे अमेरिकन अभियंते (जन्म: १६ एप्रिल १८६७)
१७७८ : व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (जन्म: २१ नोव्हेंबर १९६४)
१५७४ : चार्ल्स (नववा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १५५०)
१४३१ : फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या ’जोन ऑफ आर्क’ला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती ’द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते. (जन्म: ६ जानेवारी १४१२)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 2 May, 2014 14:47