हा या वर्षातील पहिला दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : ई कॉमर्स, ई मेल, इंटरनेट अशा इलेक्ट्रॉनिक सेवांमध्ये वापरण्यासाठी ग्रिनीच इलेक्ट्रॉनिक टाइम (GeT) या आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेची सुरुवात झाली.
१९३२ : डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
१९१९ : गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट अमलात आला व देशात कायदेमंडळे स्थापन झाली.
१९०८ : ’संगीतसूर्य’ केशवराव भोसले यांनी हुबळी येथे ’ललित कलादर्श’ ही नाटक कंपनी स्वबळावर स्थापन केली.
१९०० : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मित्रमेळ्याची स्थापना केली.
१८९९ : क्यूबामधील स्पेनची राजवट संपुष्टात आली.
१८८३ : पुणे येथे नूतन मराठी विद्यालयाची स्थापना
१८८० : विष्णूशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर आणि माधवराव नामजोशी यांनी पुणे येथे ’न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना केली.
१८६२ : इंडियन पीनल कोड अस्तित्वात आले.
१८४८ : महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली.
१८४२ : बाबा पद्मनजी यांचे ’ज्ञानोदय’ वृत्तपत्र सुरू झाले. नव्वद वर्षांनंतर याच दिवशी डॉ. ना. भि. परूळेकर यांनी 'सकाळ' वृत्तपत्र हे सुरू केले.
१८०८ : यू. एस. ए. मध्ये गुलामांच्या आयातीस बंदी घालण्यात आली.
१७५६ : निकोबार बेटे डेन्मार्कच्या ताब्यात गेली आणि त्यांना ’न्यू डेन्मार्क’ असे नाव देण्यात आले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५१ : नाना पाटेकर – अभिनेता
१९५० : दीपा मेहता – भारतीय वंशाच्या कॅनेडियन दिग्दर्शिका आणि पटकथालेखिका
१९४३ : रघुनाथ माशेलकर – शास्त्रज्ञ, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक, पद्मश्री, पद्मभूषण
१९४१ : गोवर्धन असरानी ऊर्फ ’असरानी’ – चित्रपट कलाकार
१९३६ : राजा राजवाडे – साहित्यिक (मृत्यू: २१ जुलै १९९७)
१९२८ : डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २२ मे १९९८)
१९२३ : उमा देवी खत्री उर्फ ’टुन टुन’ – अभिनेत्री व गायिका (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००३)
१९१८ : शांताबाई दाणी – ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी (मृत्यू: ९ ऑगस्ट २००२)
१९१० : जानकीदास मेहरा ऊर्फ जानकीदास – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते, निर्माते आणि पटकथालेखक, १९३६ मध्ये बर्लिन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्य, ८ विश्वविक्रम मोडणारे निष्णात सायकलपटू
(मृत्यू: १८ जून २००३)
१९०२ : कमलाकांत वामन केळकर – भारतातील भूविज्ञान अध्ययनाचा पाया घालणारे वैज्ञानिक (मृत्यू: ६ डिसेंबर १९७१)
१९०० : श्रीकृष्ण नारायण रातंजनकर – आग्रा घराण्याचे गायक, शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक व संगीत गुरू (मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७४)
१८९४ : सत्येंद्रनाथ बोस – भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (मृत्यू: ४ फेब्रुवारी १९७४)
१८९२ : महादेव देसाई – स्वातंत्र्य लढ्यातील नेते आणि महात्मा गांधींचे स्वीय सहाय्यक (मृत्यू: १५ ऑगस्ट १९४२)
१८७९ : इ. एम. फोर्स्टर – ब्रिटिश साहित्यिक (मृत्यू: ७ जून १९७०)
१६६२ : बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा (मृत्यू: १२ एप्रिल १७२०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००९ : रामाश्रेय झा – संगीतकार, वादक व शास्त्रीय संगीतातील विद्वान (जन्म: ११ ऑगस्ट १९२८)
१९८९ : दिनकर साक्रीकर – समाजवादी विचारवंत व पत्रकार
१९७५ : शंकरराव वासुदेव किर्लोस्कर – उद्योजक, साहित्यिक व चित्रकार. १९२० मधे त्यांनी किर्लोस्कर छापखान्याची स्थापना केली. त्यातुनच किर्लोस्कर, स्त्री व मनोहर या मासिकांचे संपादन सुरू केले. ’शंवाकिय’ हे त्यांचे आत्मकथन हा उत्कृष्ट आत्मचरित्राचा नमुना आहे. (जन्म: ८ आक्टोबर १८९१)
१९५५ : डॉ. शांतिस्वरुप भटनागर – वैज्ञानिक (जन्म: २१ फेब्रुवारी १८९४)
१९४४ : सर एडविन लुटेन्स – दिल्लीचे नगररचनाकार (जन्म: २९ मार्च १८६९)
१८९४ : हेन्‍रिच हर्ट्‌झ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २२ फेब्रुवारी १८५७)
१७४८ : योहान बर्नोली – स्विस गणितज्ञ (जन्म: २७ जुलै १६६७)
१५१५ : लुई (बारावा) – फ्रान्सचा राजा (जन्म: २७ जून १४६२)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 16 October, 2014 12:22