-: दिनविशेष :-

४ आक्टोबर

राष्ट्रीय एकात्मता दिवस

जागतिक प्राणी दिनEnroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

१९८३

नेवाडामधील ब्लॅक रॉक डेझर्ट येथे रिचर्ड नोबल याने आपली थ्रस्ट - २ ही गाडी ताशी १०१९ किमी वेगाने चालवून विश्वविक्रम प्रस्थापित केला.

१९५७

सोविएत रशियाने ‘स्पुटनिक-१’ हा पहिला कृत्रिम उपग्रह अंतराळात सोडून अंतराळयुगाचा प्रारंभ केला.

१९५९

सोविएत रशियाच्या ‘ल्युनिक-३’ या अंतराळयानाने चंद्राला प्रदक्षिणा घालून चंद्राच्या पृथ्वीवरुन न दिसणार्‍या भागाची छायाचित्रे घेतली.

१९४३

दुसरे महायुद्ध – अमेरिकेने प्रशांत महासागरातील सॉलोमन बेटे ताब्यात घेतली.

१९४०

दुसरे महायुद्ध – ‘ब्रेनर पास’ येथे अ‍ॅडॉल्फ हिटलर व बेनिटो मुसोलिनी यांची भेट झाली.

१९२७

गस्टन बोरग्लम याने ‘माऊंट रशमोअर’ चे शिल्प कोरण्यास सुरुवात केली.

१८२४

मेक्सिकोने नवीन राज्यघटना अंगीकारली आणि ते प्रजासत्ताक बनले.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३७

जॅकी कॉलिन्स – इंग्लिश प्रणयकथा लेखिका व अभिनेत्री. त्यांनी एकूण ३२ कादंबऱ्या लिहिल्या आणि त्या सर्वच्या सर्व न्यूयॉर्क टाइम्सच्या बेस्टसेलर यादीत होत्या.
(मृत्यू: १९ सप्टेंबर २०१५ – बेव्हरली हिल्स, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)

१९३५

अरुण सरनाईक – मराठी चित्रपट व नाट्य अभिनेते, तबलावादक, गायक आणि हार्मोनियमवादक
(मृत्यू: २१ जून १९८४)

१९२८

ऑल्विन टॉफलर – अमेरिकन पत्रकार, भविष्यवेत्ता व लेखक
(मृत्यू: २७ जून २०१६)

१९१६

धनसुखलाल तुलसीदास लाकडावाला – अर्थशास्त्रज्ञ व प्राध्यापक, सार्वजनिक अर्थकारण व आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अधिकारी व्यक्ती. योजना आयोगाचे उपाध्यक्ष, सी. एम. आय. इ. (Centre for Monitoring Indian Economy) चे आयुक्त
(मृत्यू: ????)

१९१३

सरस्वतीबाई राणे – शास्त्रीय गायिका
(मृत्यू: १० आक्टोबर २००६)

१८२२

रुदरफोर्ड हेस – अमेरिकेचे १९ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: १७ जानेवारी १८९३)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९८९

‘संगीतभूषण’ पं. राम मराठे – संगीतकार, गायक व नट
(जन्म: २३ आक्टोबर १९२४)

१९८२

सोपानदेव चौधरी – कवी. ‘काव्यकेतकी’, ‘अनुपमा’, ‘सोपानदेवी’ हे त्यांचे कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे पुत्र.
(जन्म: १६ आक्टोबर १९०७)

१९६६

अनंत अंतरकर – ‘हंस’, ‘मोहिनी’, ‘नवल’ आणि ‘सत्यकथा’ या मासिकांचे संपादक
(जन्म: १ डिसेंबर १९११)

१९४७

मॅक्स प्लँक – नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिक शास्त्रज्ञ
(जन्म: २३ एप्रिल १८५८)

१९२१

‘संगीतसूर्य’ केशवराव भोसले – ‘संगीत सौभद्र’ मधील धैर्यधराच्या भूमिकेत गाजलेले गायक अभिनेते. ‘हाच मुलाचा बाप’, ‘संन्याशाचा मुलगा’ या नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. त्यांनी स्थापन केलेल्या ललितकलादर्श संगीत नाटक मंडळींतर्फे ‘सौभद्र’, ‘शारदा’, ‘राक्षसी महत्त्वाकांक्षा’ इ. अनेक नाटके रंगभूमीवर आली.
(जन्म: ९ ऑगस्ट १८९०)

१८४७

महाराष्ट्रातील एक सद्गुणी, प्रजाहितदक्ष पण दुर्दैवी राजे प्रतापसिंह भोसले यांचे निधन. छत्रपती शाहू (दुसरे) यांचे ते थोरले चिरंजीव होत. पेशवाईच्या अस्तानंतर माऊंट स्टुअर्ट एल्फिस्टन यांनी पुन: त्यांना छत्रपतींच्या गादीवर बसवले. पाठशाळा आणि संस्कॄत व मराठीबरोबरच इंग्रजी भाषेच्या अध्यापनाला त्यांनी उत्तेजन दिले.
(जन्म: १८ जानेवारी १७९३)

१६६९

रेंब्राँ – डच चित्रकार
(जन्म: १५ जुलै १६०६)


Pageviews

This page was last modified on 22 April 2021 at 8:38pm