हा या वर्षातील ९५ वा (लीप वर्षातील ९६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००० : अभिनेत्री सुलोचना यांच्या हस्ते डी. डी. - १० या मराठी उपग्रह वाहिनीचे ’सह्याद्री’ असे नामकरण करण्यात आले.
१९५७ : कम्युनिस्ट पक्षाने भारतात प्रथमच केरळमध्ये निवडणूका जिंकल्या आणि इ. एम. एस. नंबुद्रीपाद हे केरळचे मुख्यमंत्री झाले.
१९५५ : प्रकृती अस्वास्थ्यामुळे विन्स्टन चर्चिल यांनी ब्रिटनच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला.
१९४९ : भारत स्काऊट आणि गाईडची स्थापना झाली.
१९३० : २४१ मैल प्रवास करुन महात्मा गांधी यांनी दांडीयात्रा संपविली.
१६७९ : राजारामास पकडण्यासाठी झुल्फिकारखानाने रायगडास वेढा दिला असता राजाराम रायगडावरुन प्रतापगडास गेला. पुढे प्रतापगडासही शत्रूने वेढा दिल्यावर राजारामास पन्हाळगडावर जावे लागले. [चैत्र व. १०]
१६६३ : दहा हजार फौजेसह पुण्याच्या लाल महालात तळ देऊन राहिलेला मोगल सुभेदार शाहिस्तेखान याच्यावर शिवाजी महाराजांनी दोनशे स्वारांसह अकस्मात छापा घातला. शाहिस्तेखान खिडकीतुन पळून गेल्याने बचावला; मात्र पळुन जाण्याच्या प्रयत्‍नात त्याची तीन बोटे तुटली. या प्रसंगापासून मराठीत ’जिवावरचे बोटावर निभावले’ हा शब्दप्रयोग रुढ झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९२० : डॉ. रफिक झकारिया – महाराष्ट्राचे नगरविकासमंत्री आणि लोकसभा सदस्य (मृत्यू: ९ जुलै २००५)
१९२० : आर्थर हॅले – इंग्लिश कादंबरीकार (मृत्यू: २४ नोव्हेंबर २००४)
१९१६ : ग्रेगरी पेक – हॉलीवूड अभिनेता (मृत्यू: १२ जून २००३)
१९०९ : अल्बर्ट आर. ब्रोकोली – ’जेम्स बाँड’ पटांचे निर्माते (मृत्यू: २७ जून १९९६)
१९०८ : बाबू जगजीवनराम – स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, राजकारणी, केंद्रीय मंत्री व भारताचे उपपंतप्रधान (मृत्यू: ६ जुलै १९८६)
१८५६ : बुकर टी. वॉशिंग्टन – अमेरिकन निग्रोंच्या प्रश्नासाठी कार्य करणारे समाजसेवक, लेखक, वक्ते व शिक्षणतज्ञ (मृत्यू: १४ नोव्हेंबर १९१५)
१८२७ : सर जोसेफ लिस्टर – निर्जंतुकीकरणामुळे जखमा लवकर बर्‍या होतात हे सिध्द करणारा ब्रिटिश शल्यविशारद (मृत्यू: १० फेब्रुवारी १९१२)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००२ : मनोहर राजाराम तथा मनू छाबरिया – दुबईस्थित वादग्रस्त भारतीय उद्योगपती, जम्बो ग्रुपचे संचालक (जन्म: ? ? १९४६)
१९९८ : रुही बेर्डे – चित्रपट व नाट्य अभिनेत्री (जन्म: ? ? ????)
१९९६ : भालचंद्र नीळकंठ तथा बाबा पटवर्धन – बालगंधर्वांना पंधरा वर्षे साथ करणारे ऑर्गनवादक (जन्म: ? ? ????)
१९९३ : दिव्या भारती – हिन्दी, तामिळ आणि तेलगु चित्रपट अभिनेत्री (जन्म: २५ फेब्रुवारी १९७४)
१९६४ : गोपाळ विनायक भोंडे – नकलाकार (जन्म: ? ? ????)
१९४० : चार्लस फ्रिअरी तथा दीनबंधू अ‍ॅन्ड्र्यूज – इंग्लिश मिशनरी, महात्मा गांधींचे जवळचे मित्र, समाजसेवक आणि भारताच्या स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते (जन्म: १२ फेब्रुवारी १८७१)
१९२२ : पंडिता रमाबाई – विधवा, परिक्त्यक्ता आणि स्त्रियांच्या सर्वांगीण उद्धारासाठी कार्य करणाऱ्या समाजसुधारक आणि ’आर्य महिला समाज’ च्या संस्थापिका, संस्कृत पंडित (जन्म: २३ एप्रिल १८५८)
१९१७ : शंकरराव निकम – स्वातंत्र्यशाहीर (जन्म: ? ? ????)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 17 May, 2014 20:59