हा या वर्षातील ९८ वा (लीप वर्षातील ९९ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००५ : पोप जॉन पॉल (दुसरे) यांच्या अंत्ययात्रेत अंदाजे ४० लाख लोक सहभागी झाले.
१९२९ : भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
१९११ : डच भौतिकशास्त्रज्ञ हाइक ओन्नेस यांनी अतिसंवाहकतेचा (superconductivity) शोध लावला.
१८३८ : ’द ग्रेट वेस्टर्न’ हे वाफेचे इंजिन असलेले जहाज इंग्लंडमधील ब्रिस्टॉल येथून निघून पंधरा दिवसांनी न्यूयॉर्क येथे पोचले. अटलांटिक महासागर पार करणारी ही पहिली आगबोट.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३८ : कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव
१९२८ : रणजित देसाई – नामवंत मराठी साहित्यिक, ’स्वामी’कार (मृत्यू: ६ मार्च १९९२)
१९२४ : शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ ’कुमार गंधर्व’ (मृत्यू: १२ जानेवारी १९९२)
१९२२ : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (मृत्यू: १७ आक्टोबर १८६९)
१३३६ : तैमूरलंग – मंगोलियाचा राजा (मृत्यू: १४ फेब्रुवारी १४०५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१३ : मार्गारेट थॅचर – ब्रिटनच्या एकमेव महिला पंतप्रधान (जन्म: १३ आक्टोबर १९२५)
१९९९ : वसंत खानोलकर – कामगार नेते, समाजवादी चळवळीतील एक अग्रणी, नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर यांचे वडील (जन्म: ? ? ????)
१९७४ : नटवर्य गोपाळ गोविंद ऊर्फ नानासाहेब फाटक – मर्दानी रुप, तिन्ही सप्तकांतुन सहजपणे फिरणारा आवाज या देणग्या लाभलेले व गंधर्वयुगाची स्मृती जागवणारे रंगभूमीवरील कलाकार (जन्म: २४ जून १८९९)
१९७३ : पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार (जन्म: २५ आक्टोबर १८८१)
१९५३ : वालचंद हिराचंद दोशी – उद्योगपती (जन्म: २३ नोव्हेंबर १८८२)
१९२२ : ’गायनाचार्य’ पं. भास्करबुवा बखले – अष्टपैलू व चतुरस्त्र शैलीचे ग्वाल्हेर घराण्याचे प्रतिभावान गायक, बालगंधर्व आणि मास्टर कृष्णराव यांचे गुरू, ’भारत गायन समाज’ या संस्थेचे संस्थापक (जन्म: १७ आक्टोबर १८६९)
१८९४ : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय – बंगाली कादंबरीकार, कवी, लेखक आणि पत्रकार. त्यांनी लिहिलेल्या ’आनंदमठ’ या कादंबरीत ’वंदे मातरम’ हे गीत असून या गीताने स्वातंत्र्यलढ्यातील सहभागींना प्रेरणा मिळाली. (जन्म: २७ जून १८३८)
१८५७ : १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामची सुरूवात करणारा मंगल पांडे याला फाशी देण्यात आले. [चैत्र शु. १४] (जन्म: १९ जुलै १८२७)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 28 February, 2015 15:25