हा या वर्षातील २७० वा (लीप वर्षातील २७१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९६ : तालिबानने अफगाणिस्तानातील काबूल शहर जिंकले. राष्ट्राध्यक्ष बुर्‍हानुद्दीन रब्बानी यांनी पलायन केले तर मोहम्मद नजीबुल्लाह यांना भर चौकात फाशी देण्यात आले.
१९६१ : सिएरा लिओनचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश
१९५८ : मिहीर सेन हा इंग्लिश खाडी पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू बनला.
१९४० : दुसरे महायुद्ध – बर्लिन येथे जर्मनी, जपान व ईटली या देशांत त्रिपक्षीय तह झाला.
१९२५ : डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली.
१८२१ : मेक्सिकोला (स्पेनपासुन) स्वातंत्र्य मिळाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१ : लक्ष्मीपती बालाजी – क्रिकेटपटू
१९८१ : ब्रॅन्डन मॅककलम – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९६२ : गेव्हिन लार्सन – न्यूझीलंडचा क्रिकेटपटू
१९५३ : माता अमृतानंदमयी
१९३२ : यश चोप्रा – चित्रपट दिग्दर्शक, पटकथालेखक आणि निर्माते (मृत्यू: २१ आक्टोबर २०१२)
१९०७ : वामनराव देशपांडे – संगीत समीक्षक (मृत्यू: ? ? १९९०)
१६०१ : लुई (तेरावा) – फ्रान्सचा राजा (मृत्यू: १४ मे १६४३)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००८ : महेन्द्र कपूर – पार्श्वगायक (जन्म: ९ जानेवारी १९३४ - अमृतसर)
२००४ : शोभा गुर्टू – शास्त्रीय गायिका (जन्म: ८ फेब्रुवारी १९२५)
१९९९ :  डॉ. मेबल आरोळे – रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेत्या बहुद्देशीय ग्रामीण आरोग्य प्रकल्पाच्या संचालिका (जन्म: २६ डिसेंबर १९३५)
१९९२ : अनुताई वाघ – समाजसेविका (जन्म: १७ मार्च १९१०)
१९७५ : तिरुवेंकट राजेंद्र शेषाद्री – रसायनशास्त्रज्ञ (जन्म: ३ फेब्रुवारी १९००)
१९७२ : एस. आर. रंगनाथन – भारतीय गणितज्ञ व ग्रंथालयशास्त्रतज्ञ (जन्म: १२ ऑगस्ट १८९२)
१९२९ : शिवराम महादेव परांजपे – ’काळ’ कर्ते, विद्वान, वक्ते, लेखक, स्वातंत्र्यसैनिक व पत्रकार (जन्म: २७ जून १८६४)
१८३३ : राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले. (जन्म: २२ मे १७७२)
१७२९ : मराठेशाहीच्या आपत्‌प्रसंगी पराक्रम गाजवणारे खंडेराव दाभाडे यांचे निधन. दाभाडे घराण्याला सातशे गावांची देशमुखी असल्यामुळे त्यांना वतनदारांचे मुकुटमणी म्हणत. [वैशाख व. १४, शके १६५१]
(जन्म: ? ? १६६५)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 2 March, 2014 17:27