हा या वर्षातील २४६ वा (लीप वर्षातील २४७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९७१ : कतारला स्वातंत्र्य मिळाले.
१९१६ : श्रीमती अ‍ॅनी बेझंट यांनी ’होमरुल लीग’ची स्थापना केली.
१७५२ : अमेरिकेत ग्रेगरीयन कॅलेंडरचा वापर सुरू झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७६ : विवेक ओबेरॉय – अभिनेता
१९४० : प्यारेलाल रामप्रसाद शर्मा – चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्‍या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार
१९३१ : श्याम फडके – नाटककार (’काका किशाचा’, ’तीन चोक तेरा’, ’राजा नावाचा गुलाम’ फेम)
१९२७ : अरुण कुमार चटर्जी तथा ’उत्तम कुमार’ – बंगाली व हिन्दी चित्रपट अभिनेते (मृत्यू: २४ जुलै १९८०)
१९२३ : कृष्णराव तथा ’शाहीर’ साबळे – महाराष्ट्र शाहीर
१९२३ : किशन महाराज – तबलावादक (मृत्यू: ४ मे २००८)
१८७५ : फर्डिनांड पोर्श – ऑस्ट्रियन वाहन अभियंता (मृत्यू: ३० जानेवारी १९५१)
१८६९ : फ्रिट्झ प्रेग्ल – सेंद्रीय पदार्थांच्या पृथ्थक्‍करणासाठी १९२३ मधील रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळवणारे ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ (मृत्यू: १३ डिसेंबर १९३०)
१८५५ : पंत महाराज बाळेकुन्द्री – आध्यात्मिक गुरू (मृत्यू: १६ आक्टोबर १९०५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : पांडुरंग पुरुषोत्तम शिरोडकर – स्वातंत्र्यसैनिक, गोवा विधानसभेचे पहिले सभापती
१९६७ : अनंत हरी गद्रे तथा समतानंद – वार्ताहर, संपादक, थोर समाजसुधारक आणि नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक, जाहिरातशास्त्रातील तज्ञ. ’मौज’ आणि ’निर्भिड’ ही साप्ताहिके त्यांनी सुरू केली. जातीयता निर्मूलनासाठी त्यांनी सहभोजनाचा (त्या काळातील धाडसी) उपक्रम चालवला. (जन्म: १६ आक्टोबर १८९०)
१९५८ : माधव केशव काटदरे – निसर्गकवी (जन्म: ३ डिसेंबर १८९२)
१९५३ : लक्ष्मण तथा ’खाप्रुमामा’ पर्वतकर – तबला, घुमट व सारंगीवादक. गोव्यातील ’घुमट’ हे तालवाद्य ते अत्यंत कौशल्याने वाजवत. त्यांनी लयकारीमध्ये विविध नावीन्यपूर्ण प्रयोग केले. त्यांच्या अद्वितीय लयसिद्धीमुळे ख्यातनाम शास्त्रीय गायक उस्ताद अल्लादियाखाँ यांनी ’लयब्रम्हभास्कर’ ही पदवी देऊन त्यांचा यथोचित गौरव केला. त्यांनी पावणेसोळा मात्रांचा 'परब्रम्ह' ताल रचून त्यात पाव मात्रेचे १२५ ‘धा’ असलेली ‘महासुदर्शन’ नामक परण बांधली. (जन्म: ? ? १८८०)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Wednesday, 19 February, 2014 20:36