हा या वर्षातील १२६ वा (लीप वर्षातील १२७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००२ : भूपिंदर नाथ किरपाल यांनी भारताचे ३१ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००१ : पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी सिरीयातील एका मशिदीस भेट दिली. मशिदीस भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
१९९९ : महाराष्ट्र राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांत महिलांना तीस टक्‍के आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला. अस निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले.
१९९७ : बँक ऑफ इंग्लंड’ला स्वायत्तता देण्यात आली.
१९९४ : इंग्लंडची राणी एलिझाबेथ (दुसरी) आणि फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकॉइस मित्राँ यांच्या हस्ते इंग्लिश खाडीखालुन जाणार्‍या आणि इंग्लंड व फ्रान्स यांना जोडणार्‍या ’युरो टनेल’चे उद्‍घाटन झाले.
१८८९ : पॅरिसमधील ’आयफेल टॉवर’चे उद्‍घाटन झाले.
१८४० : एक पेनी किमतीचे ’पेनी ब्लॅक’ नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट इंग्लंडमध्ये विक्रीसाठी खुले झाले. हे तिकीट १ मे १८४० रोजी जारी झाले होते.
१८१८ : [वैशाख शु. १ शके १७४०] राजधानी रायगड लढवत असताना शेवटच्या बाजीरावाची पत्‍नी वाराणशीबाई इंग्रजांकडून पराभूत झाली.
१६३२ : शहाजहान बादशहा व आदिलशहा यांच्यामधे शहाजीला पराभूत करण्याबद्दल तह झाला.
१५४२ : सेंट फ्रान्सिस झेव्हिअर तत्कालीन पोर्तुगीज गोव्याची राजधानी ओल्ड गोवा येथे पोहोचला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५३ : टोनी ब्लेअर – ब्रिटनचे पंतप्रधान आणि मजूर पक्षाचे अध्यक्ष
१९५१ : लीला सॅमसन भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका आणि लेखिका. संगीत नाटक अकादमी आणि फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षा
१९२० : बुलो चंदीराम रामचंदानी ऊर्फ बुलो सी. रानी – जुन्या पिढीतील संगीतकार व गायक (मृत्यू: २४ मे १९९३ - मुंबई)
१८६१ : मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित (मृत्यू: ६ फेब्रुवारी १९३१)
१८५६ : सिग्मंड फ्रॉईड – ऑस्ट्रियन मानसशास्त्रज्ञ, आधुनिक मानसशास्त्राचा जनक (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३९)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९ : कृष्णाजी शंकर हिंगवे – पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे पहिले ग्रंथपाल व संस्थापक सदस्य (जन्म: ? ? ????)
१९९५ : आचार्य गोविंदराव गोसावी – प्रवचनकार, संत वाङ्‍मयाचे गाढे अभ्यासक, हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक (जन्म: ? ? ????)
१९६६ : रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे – भारतातील पहिले सिनिअर रँग्लर, फर्ग्युसन महाविद्यालयाचे प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, मुंबई राज्याचे शिक्षणमंत्री, भारताचे ऑस्ट्रेलियातील उच्‍चायुक्त (जन्म: १६ फेब्रुवारी १८७६)
१९५२ : मारिया माँटेसरी – इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ञ. पूर्वप्राथमिक शिक्षणाविषयीच्या त्यांच्या उपक्रमामुळे तशा शाळा ’माँटेसरी’ या नावाने ओळखल्या जातात. (जन्म: ३१ ऑगस्ट १८७०)
१९४६ : भुलाभाई देसाई – स्वातंत्र्यसेनानी व कायदेपंडित, त्यांनी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते, १९३१ मधे ’गांधी-आयर्विन’ कराराप्रमाणे त्यांनी बार्डोलीच्या शेतकर्‍यांची बाजू मांडली. १९३२ मध्ये कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना एक वर्षाचा कारावास व दहा हजार रुपये दंड अशी शिक्षा झाली होती. (जन्म: १३ आक्टोबर १८७७)
१९२२ : छत्रपती शाहू महाराज – सामाजिक सुधारणांचे कृतीशील पुरस्कर्ते, कला, नाटक, संगीत यांचे प्रोत्साहक (जन्म: २६ जून १८७४)
१८६२ : हेन्‍री थोरो – अमेरिकन लेखक व विचारवंत (जन्म: १२ जुलै १८१७)
१५८९ : रामतनू पांडे ऊर्फ मोहमाद आट्टा खान तथा संगीतसम्राट तानसेन – अकबराच्या दरबारातील एक नवरत्‍न (जन्म: ? ? १५०६)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 16 January, 2015 15:19