हा या वर्षातील सहावा दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९४४ : दुसरे महायुद्ध – रशियन सैन्य पोलंडमध्ये शिरले.
१९२९ : गोरगरिब व रुग्णांची सेवा करण्यासाठी मदर तेरेसा यांचे कोलकाता येथे आगमन
१९२४ : राजकारणात भाग न घेणे व रत्‍नागिरी जिल्ह्यातच राहणे या अटींवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मठेपेतुन सशर्त मुक्तता
१९१२ : न्यू मेक्सिको हे अमेरिकेचे ४७ वे राज्य बनले.
१९०७ : मारिया माँटेसरी यांनी पहिली माँटेसरी शाळा सुरूकेली. त्यांच्या शाळांमुळे पूर्वप्राथमिक शिक्षणात आमूलाग्र बदल झाला.
१८३२ : पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी इंग्रजी व मराठीतील पहिले साप्ताहिक वृत्तपत्र ’दर्पण’ सुरू केले.
१६७३ : कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या ६० मावळ्यांनिशी पन्हाळा जिंकुन महाराजांचे १३ वर्षे अपुर्ण असलेले स्वप्‍न पूर्ण केले.
१६६५ : शिवाजी महाराजांनी सूर्यग्रहणाच्या निमित्ताने राजमाता जिजाऊ व सोनोपंत विश्वनाथ डबीर यांची सुवर्णतुला केली. श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील देवळासमोर ही सुवर्णतुला झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६६ : ए. आर. रहमान – संगीतकार
१९५९ : कपिल देव निखंज – भारतीय क्रिकेटकप्तान, समालोचक व प्रशिक्षक
१९५५ : रोवान अ‍ॅटकिन्सन – विनोदी अभिनेते व पटकथालेखक
१९३१ : डॉ. आर. डी. देशपांडे – पर्यावरण क्षेत्रातील शा’स्त्रज्ञ, ’महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स’चे (आघारकर रिसर्च इन्स्टिट्युट) अध्यक्ष
१९२५ : रमेश मंत्री – प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक (मृत्यू: १९ जून १९९८)
१८८३ : खलील जिब्रान – लेबनॉनमधे जन्मलेले अमेरिकन कवी, लेखक व कलाकार (मृत्यू: १० एप्रिल १९३१)
१८६८ : गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे उर्फ 'दासगणू महाराज' – आधुनिक संतकवी, ’भक्तिरसामृत’, ’भक्तकथामृत’ आणि ’संतकथामृत’ हे त्यांचे संतचरित्रात्मक ग्रंथ आहेत. (मृत्यू: २५ नोव्हेंबर १९६२)
१८१२ : बाळशास्त्री जांभेकर – मराठी पत्रकारितेचे पितामह, १८३२ मधे 'दर्पण' हे वृत्तपत्र काढून त्यांनी वृत्तपत्र व्यवसायाचा पाया घातला. ’दिग्दर्शन’ हे मराठीतील पहिले मासिकही त्यांनीच १८४० मधे सुरू केले. (मृत्यू: १८ मे १८४६)
१४१२ : फ्रान्सला परकीय जोखडातून मुक्त करणार्‍या ’जोन ऑफ आर्क’चा जन्म. तिला चेटकीण ठरवून जाळण्यात आले. नंतर मात्र तिला संत ठरवले गेले. ती ’द मेड ऑफ ऑर्लिन्स’ या टोपणनावानेही ओळखली जाते. (मृत्यू: ३० मे १४३१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१० : प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे – लेखक व इंग्रजीचे प्राध्यापक (जन्म: १६ जुलै १९४३)
१९८४ : ’विद्यानिधी’ सिद्धेश्वरशास्त्री विष्णू चित्राव – महामहोपाध्याय, वैदिक साहित्याचे अभ्यासक व मराठी कोशकार (जन्म: १ फेब्रुवारी १८८४)
१९८१ : ए. जे. क्रोनिन – स्कॉटिश लेखक (जन्म: १९ जुलै १८९६)
१९७१ : प्रफुल्लचंद्र तथा पी. सी. सरकार – जादूगार (जन्म: २३ फेब्रुवारी १९१३)
१९१९ : थिओडोर रुझव्हेल्ट – अमेरिकेचे २६ वे राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: २७ आक्टोबर १८५८)
१९१८ : जी. कँटर – जर्मन गणितज्ञ (जन्म: ३ मार्च १८४५)
१८८५ : भारतेंदू हरिश्चंद्र – आधुनिक हिन्दी साहित्याचे जनक मानले जाणारे हिन्दी साहित्यिक, १८५० ते १९०० हा काळ हिन्दी साहित्यात ’भारतेंदू काळ’ म्हणून ओळखला जातो. (जन्म: ९ सप्टेंबर १८५०)
१८८४ : ग्रेगोर मेंडेल – जनुकांची (genes) संकल्पना मांडणारा जर्मन जीवशास्त्रज्ञ (जन्म: २० जुलै १८२२)
१८५२ : लुई ब्रेल – अंधांना उपयोगी पडणाऱ्या ब्रेल लिपीचे जनक व शिक्षक (जन्म: ४ जानेवारी १८०९)
१८४७ : त्यागराज – दाक्षिणात्य संगीतकार (जन्म: ४ मे १७६७)
१७९६ : जिवबा दादा बक्षी – महादजी शिंदे यांचे सेनापती, मुत्सद्दी (जन्म: ? ? ????)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 16 October, 2014 14:22