देशातील रासायनिक उद्योगाची वाढ आणि प्रगतीसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाऊंडेशनतर्फे ‘हॉल ऑफ फेम’ हा विशेष पुरस्कार जाहीर
राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील (NCL) सेंद्रीय रसायनशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. के. एन. गणेश यांना ‘शांतिस्वरुप भटनागर’ पुरस्कार जाहीर
गीतकार मजरुह सुलतानपुरी यांना राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा यांच्या हस्ते ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच गीतकार आहेत.
लातूर येथे झालेल्या भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार तर हजारो लोक बेघर झाले.
दुलीप करंडकाचा पहिला सामना चेन्नई (मद्रास) येथे खेळला गेला.
पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश
अमेरिकेतील अॅरिझोना आणि नेवाडा राज्यांच्या सीमेवर असलेल्या कोलोरॅडो नदीवरील हूव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले. १९३१ मध्ये या धरणाच्या बांधकामास सुरुवात झाली होती.
(Image Credit: Sonu Rai)
फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.
हेन्री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.
हृषिकेश मुकर्जी – चित्रपट दिग्दर्शक, संकलक आणि लेखक. सुमारे चार दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी अनाडी, सत्यकाम, चुपके चुपके, अनुपमा, आनंद, अभिमान, गुड्डी, गोल माल, आशीर्वाद, बावर्ची, खूबसूरत, नमक हराम इ. ४२ चित्रपटांचे दिग्दर्शन केले. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) तसेच केंद्रीय फिल्म प्रमाणन बोर्डाचे (CBFC) अध्यक्ष. दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९९), पद्मविभूषण (२००१) इ. पुरस्कारांनी सन्मानित.
(मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)
(Image Credit: Wikipedia)
पं. फिरोझ दस्तूर – किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक
(मृत्यू: ९ मे २००८)
(Image Credit: विकिपीडिया)
मदन पुरी – हिन्दी व पंजाबी चित्रपटांतील चरित्र अभिनेता
(मृत्यू: १३ जानेवारी १९८५ - मुंबई )
(Image Credit: Cinestaan)
एम. सी. छागला – न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री
(मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)
केन्द्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री, काँग्रेसचे नेते व ग्वाल्हेरच्या राजघराण्याचे वंशज माधवराव शिवाजीराव शिंदे यांचे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात निधन
(जन्म: १० मार्च १९४५ - मुंबई)
चंद्राताई किर्लोस्कर – ‘भूदान’ चळवळीतील कार्यकर्त्या
(जन्म: ? ? ????)
गंगाधर देवराव खानोलकर – लेखक व चरित्रकार, ‘अर्वाचीन मराठी वाड़्मय सेवक’ या कोशाचे सात खंड त्यांनी प्रकाशित केले.
(जन्म: १९ ऑगस्ट १९०३)
चार्लस रिच्टर – अमेरिकन भूवैज्ञानिक
(जन्म: २६ एप्रिल १९००)
मार्सेलिओ माल्पिघी – इटालियन डॉक्टर
(जन्म: १० मार्च १६२८)
This page was last modified on 29 September 2021 at 11:51pm