-: दिनविशेष :-

२१ मे

दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिन

जागतिक चहा दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९६

सांगली जिल्ह्यातील माधवराव पाटील हे ब्रिटन मधील इलिंग शहराचे महापौर झाले.

१९९४

४३ व्या जागतिक सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंडिया’ सुश्मिता सेनने ‘मिस युनिव्हर्स’ हा किताब पटकावला. हा किताब मिळवणारी ती पहिलीच भारतीय आहे.

१९९२

चीनने १,००० किलो टन क्षमतेच्या अणुबॉम्बची यशस्वी चाचणी केली. हा जगातील सर्वात शक्तिशाली अणुस्फोट आहे.

१९९१

पंतप्रधान राजीव गांधी यांची श्रीपेरांबदुर येथे एल. टी. टी. ई. च्या आत्मघातकी पथकाने हत्या केली.

१८८१

वॉशिंग्टन (डी. सी.) येथे ‘अमेरिकन रेड क्रॉस’ची स्थापना झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५६

रवींद्र मंकणी

रवींद्र मंकणी – अभिनेता

(Image Credit: IMDb)

१९३१

शरद जोशी – हिन्दी कवी, लेखक व उपहासकार
(मृत्यू: ५ सप्टेंबर १९९१)

१९२८

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी – कला समीक्षक व लेखक. त्यांचे ‘पाऊस’, ‘भरती’, ‘चिद्‌घोष’,हे कथासंग्रह, ‘दोन बहिणी’, ‘कोंडी’ या कादंबर्‍या व ‘पिकासो’ हे चरित्र प्रसिद्ध आहे.
(मृत्यू: २३ डिसेंबर २०१०)

१९२३

अर्मांड बोरेल – स्विस गणितज्ञ
(मृत्यू: ११ ऑगस्ट २००३)

१९१६

हेरॉल्ड रॉबिन्स – अमेरिकन कादंबरीकार
(मृत्यू: १४ आक्टोबर १९९७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०२१

सुंदरलाल बहुगुणा

सुंदरलाल बहुगुणा – ‘चिपको’ आंदोलनाचे प्रणेते व ‘The Sentry of the Himalayas’ म्हणून ओळखले जाणारे पर्यावरणरक्षक निसर्गऋषी
(जन्म: ९ जानेवारी १९२७)

(Image Credit:  Twitter)

१९९८

आबासाहेब बाबूराव किल्लेदार – इंटकचे सोलापुरातील नेते, सोलापुरचे नगराध्यक्ष व आमदार
(जन्म: ? ? ????)

१९९१

निवडणूक प्रचार करत असताना भारताचे ६ वे पंतप्रधान राजीव गांधी यांची तामिळनाडुमधील श्रीपेरांबदूर येथे एल. टी. टी. ई. च्या अतिरेक्यांनी आत्मघाती स्फोटात हत्या केली. त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न (१९९१) देण्यात आले.

(जन्म: २० ऑगस्ट १९४४)

१९७९

जानकीदेवी बजाज

जानकीदेवी बजाज – स्वातंत्र्य वीरांगना, १९३२ च्या असहकार आंदोलनातील सक्रिय कार्यकर्त्या, पदमविभूषण (१९५६), अखिल भारतीय गौसेवा संघाच्या अध्यक्षा. स्वातंत्र्यानंतर त्यांनी स्वतःला विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत झोकून दिले. विनोबा भावे यांचा वर्ध्याजवळील सेवाग्राम आश्रम हा बजाज कुटुंबीयांनी दान केलेल्या ३००० एकर जमिनीवर उभा आहे.
(जन्म: ७ जानेवारी १८९३)

(Image Credit: Jamnalal Bajaj Foundation)

१६८६

ऑटो व्हॉन गॅरिक – वातावरणाबाबत मूलभूत सिद्धांत मांडणारे जर्मन पदार्थवैज्ञानिक
(जन्म: ३० नोव्हेंबर १६०२)

१४७१

हेन्‍री (सहावा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: ६ डिसेंबर १४२१)



Pageviews

This page was last modified on 22 May 2021 at 8:05am