लेखिका व कवयित्री अमृता प्रीतम यांना दिल्ली सरकारचा अकरा लाख रुपयाचा सहस्रकातील कवयित्री हा पुरस्कार जाहीर
भूतानमधे दूरचित्रवाणी प्रसारण सुरू झाले.
पोप जॉन पॉल (दुसरे) यांनी (आपल्या मायदेशाला) पोलंडला भेट दिली. कम्युनिस्ट राष्ट्राला भेट देणारे ते पहिलेच पोप होत.
इंग्लंडची राणी दुसरी एलिझाबेथ हिचा राज्यारोहण समारंभ झाला. इंग्लंडच्या राष्ट्रप्रमुखाचा राज्यारोहण समारंभ प्रथमच दूरचित्रवाणीद्वारे जगभर पाहिला गेला.
दक्षिण अफ्रिकेने श्वेतवर्णीय सोडुन इतरांना दुय्यम नागरिक ठरवण्याचा कायदा केला.
आपल्या मृत्यूचे वृत्त वर्तमानपत्रात वाचून मार्क ट्वेनने न्यूर्यॉक टाईम्सला सांगितले -
माझ्या मृत्यूचे वृत्त ही अतिशयोक्ती आहे!
गुग्लिएल्मो मार्कोनी यांनी ‘रेडिओ’चे पेटंट घेतले.
गाटा काम्स्की – जन्माने रशियन असलेला अमेरिकन ग्रँडमास्टर, ५ वेळा अमेरिकन विजेता, [सर्वोच्च फिडे मानांकन २७६३ (जुलै २०१३)]
(Image Credit: chessbase.com)
आनंद अभ्यंकर – अभिनेते
(मृत्यू: २३ डिसेंबर २०१२)
गोपाल रत्नम सुब्रमणियम तथा मणीरत्नम – तामिळ (व हिंदी) चित्रपटांचे दिग्दर्शक, पटकथालेखक व निर्माते
(Image Credit: Wikipedia)
थॉमस हार्डी – इंग्लिश लेखक आणि कवी
(मृत्यू: ११ जानेवारी १९२८)
मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेची पहिली ‘फर्स्ट लेडी’
(मृत्यू: २२ मे १८०२)
डॉ. गुंथर सोन्थायमर – महाराष्ट्र लोकधर्म व मराठी संस्कृतीचे जर्मन अभ्यासक
(जन्म: २१ एप्रिल १९३४)
सर रेक्स हॅरिसन – ब्रिटिश तसेच अमेरिकन रंगभूमीवरील आणि हॉलिवूड चित्रपटांतील अभिनेते. त्यांनी ‘शालीमार’ या एका हिंदी चित्रपटातही भूमिका केली होती.
(जन्म: ५ मार्च १९०८)
राज कपूर – अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक आणि ‘द ग्रेटेस्ट शो मॅन’
(जन्म: १४ डिसेंबर १९२४)
देवेन्द्र मोहन बोस – वैश्विक किरणांवर मूलभूत संशोधनाची सुरूवात करणारे भारतीय पदार्थवैज्ञानिक
(जन्म: २६ नोव्हेंबर १८८५)
जुसेप्पे गॅरीबाल्डी – इटालियन सेनापती व राजकीय नेता
(जन्म: ४ जुलै १८०७)
This page was last modified on 01 June 2021 at 6:47pm