हक्कभंगाची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे पाकिस्तानचे अध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी राजीनामा दिला.
ईंडोनेशियाच्या जावा - बाली या बेटांवर वीज गेल्यामुळे १० कोटि लोक सुमारे आठ तास वीजपुरवठ्याविना
कोणताही गुन्हा शाबित झाल्यानंतर तुरुंगवास भोगत असलेल्या अथवा कोणत्याही कारणासाठी पोलिस कोठडीत ठेवण्यात आलेल्या व्यक्तीस मतदानाचा हक्क बजावता येणार नाही असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
शेरपूर येथील स्वातंत्र्यसैनिकांच्या एका समुहाने उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोहम्मदाबाद येथे तिरंगा फडकावला.
अमेरिकेच्या संविधानात १९ वा बदल झाला आणि महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. यापूर्वी १९१५ मध्ये महिलांना मतदानाचा अधिकार देण्याचा प्रस्ताव अमेरिकन संसदेने फेटाळला होता.
जगात सर्वप्रथम ब्रिटनमधे राष्ट्रीय अग्निशमन दलाची स्थापना
प्रीती जंघियानी – अभिनेत्री
दलेर मेहंदी – भांगडा गायक
संदीप पाटील – शैलीदार व धडाकेबाज फलंदाज. १९८३ च्या विश्वकरंडक विजेत्या संघाचा सदस्य
रॉबर्ट रेडफोर्ड – हॉलिवूडमधील तगडा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता, उद्योगपती, पर्यावरणवादी आणि दानशूर. दोनदा ऑस्कर पुरस्कार, ब्रिटिश फिल्म पुरस्कार, तीनदा गोल्डन ग्लोब पुरस्कार, सेसिल डी मिल पुरस्कार आणि प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ फ्रीडम अशा अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित
संपूर्ण सिंग कालरा ऊर्फ ‘गुलजार’ – संवेदनाशील मनाचे कवी, गीतकार, लेखक व दिग्दर्शक
सदाशिव गणपतराव ऊर्फ ‘सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज. शरद पवार यांचे ते सासरे होत.
(मृत्यू: २२ जून १९५५)
विजयालक्ष्मी पंडीत – राजदूत, मुत्सद्दी व राजकारणी
(मृत्यू: १ डिसेंबर १९९०)
‘सेवानंद’ गजानन नारायण तथा बाळूकाका कानिटकर – अनाथ विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
(मृत्यू: १२ नोव्हेंबर १९५९)
‘गायनाचार्य’ पं. विष्णू दिगंबर पलुसकर – संगीतज्ञ, गायक, संगीतप्रसारक आणि गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक
(मृत्यू: २१ ऑगस्ट १९३१)
रघुनाथराव पेशवा
(मृत्यू: ११ डिसेंबर १७८३)
थोरले बाजीराव पेशवे ऊर्फ श्रीमंत बल्लाळ बाळाजी भट
(मृत्यू: २८ एप्रिल १७४०)
कोफी अन्नान – संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) चे ७ वे प्रधान सचिव
(जन्म: ८ एप्रिल १९३८ - कुमासी, घाना)
नारायण धारप – रहस्यकथाकार
(जन्म: २७ ऑगस्ट १९२५)
वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे चौथे (आणि आतापर्यंत सर्वाधिक कार्यकाळ असलेले) मुख्यमंत्री (५ डिसेंबर १९६३ ते २० फेब्रुवारी १९७५), ६ व्या लोकसभेतील खासदार (वाशीम मतदारसंघ), मध्यप्रदेशमधील विधानपरिषदेचे सदस्य
(१९५२ - १९५७)
(जन्म: १ जुलै १९१३)
नेताजी सुभाषचंद्र बोस – स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद हिन्द सेनेचे सरसेनापती. नेताजींचे संघटनाकौशल्य, समयसूचकता व मुत्सद्देगिरी असामान्य होती. त्यांना घेऊन जाणार्या विमानाला तैवानमधील तैपैई विमानतळावर अपघात होऊन त्यांचे निधन
झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त दीर्घकाळ अज्ञात राहिल्याने त्याविषयी पुढे शंका निर्माण झाली.
(जन्म: २३ जानेवारी १८९७ - कटक, ओरिसा)
वॉल्टर ख्राइसलर – ‘ख्राइसलर’ कंपनीचे संस्थापक
(जन्म: २ एप्रिल १८७५)
This page was last modified on 01 October 2021 at 10:30am