-: दिनविशेष :-

१८ एप्रिल

जागतिक वारसा दिन

World Heritage Day

आपल्या पूर्वजांनी प्राचीन काळी अनेक मंदिरे, गुहा, लेणी, किल्ले, स्मारके अशा गोष्टी बांधून ठेवल्या आहेत. त्यासंबंधात आस्था निर्माण करण्यासाठी व पुरातन गोष्टी जतन करण्याची जाणीव असावी यासाठी हा दिवस जागतिक वारसा दिन (World Heritage Day) म्हणून साजरा केला जातो.

महत्त्वाच्या घटना:

२००१

भूसंलग्न उपग्रह प्रक्षेपक (GSLV- D1) वाहकाचे रशियन बनावटीच्या क्रायोजेनिक इंजिनाच्या साहाय्‍याने श्रीहरिकोटा तळावरून यशस्वी प्रक्षेपण

१९७१

एअर इंडियाचे पहिले बोईंग ७४७ जंबो जेट विमान ‘सम्राट अशोक’ शाही दिमाखात सकाळी ८-२० वाजता सांताक्रूझ विमानतळावर दाखल.

१९५४

गामल अब्दल नासर याने इजिप्तची सत्ता ताब्यात घेतली.

१९५०

तेलंगणा (पूर्वीचे आंध्रप्रदेश) राज्यातल्या पोचमपल्ली खेड्यातील ८० एकर जमीनीच्या भूदानाने विनोबा भावे यांची भूदान चळवळ सुरू झाली.

१९३६

पेशव्यांची राजधानी असणार्‍या पुण्यातील शनिवारवाडा पुरातत्व विभागाकडे सुपूर्त करण्यात आला.

१९३०

स्वातंत्र्यलढ्यातील क्रांतिकारकांनी चितगाव येथील शस्त्रागार लुटले.

१९३०

आज काहीही बातमी नाही असे बी. बी. सी. या नभोवाणी केंद्रावरुन सांगण्यात आले.

१९२४

सायमन व शूस्टर यांनी पहिले शब्दकोड्यांचे पुस्तक प्रकाशित केले.

१९२३

पुण्याच्या शिवाजी मंदिरात शिवजयंतीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संगमरवरी अर्धपुतळ्याची स्थापना करण्यात आली. हा राज्यातील पहिला शिवपुतळा आहे. या पुतळ्याचे अनावरण मंदिराचे देणगीदार दिवंगत गणेश गोखले यांचे चिरंजीव डॉक्टर महादेव गोखले यांच्या हस्ते करण्यात आले.

१९२३

‘टायटॅनिक’ मधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन ‘कार्पेथिया’ हे जहाज न्यूयॉर्कला पोचले.

१८९८

जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी [चैत्र व. १३ शके १८२०]

१७०३

औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला.

१३३६

विजयनगर साम्राज्य

हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली. [वैशाख शु. ७ शके १२५८]

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५८

माल्कम मार्शल

माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा जलदगती गोलंदाज
(मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९९)

(Image Credit: wikiheights.com)

१९५६

पूनम धिल्लन – अभिनेत्री

१९१६

ललिता पवार – अभिनेत्री
(मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९८)

१९१०

विश्वनाथ नागेशकर – चित्रकार
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ - मुरुड)

१८५८

महर्षी अण्णासाहेब तथा धोंडो केशव कर्वे – स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक, पद्मभूषण, भारतरत्‍न
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ - मुरुड)

१७७४

सवाई माधवराव पेशवा
नाना फडणवीस यांच्या समवेत

सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म [वैशाख शु. ७ शके १६९६ जयनाम संवत्सर]
(मृत्यू: २७ आक्टोबर १७९५ - शनिवारवाडा, पुणे)

(Image Credit: Wikipedia)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतीदिन:

२००२

शरद शंकर दिघे – महाराष्ट्र विधान सभेचे अध्यक्ष, लोकसभा खासदार
(जन्म: १० आक्टोबर १९२४)

२००२

थोर हेअरडल

थोर हेअरडल – नॉर्वेजियन दर्यावर्दी व संशोधक
(जन्म: ६ आक्टोबर १९१४)

(Image Credit: Sweet Search / AP)

१९९९

रघूवीर सिंह – आंतरराष्ट्रीय ख्यातीचे छायाचित्रकार
(जन्म: २२ आक्टोबर १९४२ - जयपूर)

१९९८

चित्रपट निर्माते विजय सिप्पी (वय ५५) यांचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू
(जन्म: ????)

१९९५

पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते – पंचांगकर्ते आणि ज्योतिषशास्त्राचे व्यासंगी अभ्यासक
(जन्म: ३० मार्च १९२१)

१९६६

जगन्नाथ गणेश गुणे तथा स्वामी कुवलयानंद – योगविद्येचे पुरस्कर्ते व शारीरिक शिक्षणतज्ञ, त्यांनी १९२४ मध्ये ’कैवल्यधाम’ नावाची योगशिक्षणसंस्था स्थापन केली. संस्थेतील प्रयोगांची माहिती व्हावी यासाठी ’योगमीमांसा’ नावाचे त्रैमासिक काढले. त्याचे ७ खंड प्रकाशित झाले आहेत.
(जन्म: ३० ऑगस्ट १८८३ - डभई, गुजराथ)

१९५५

अल्बर्ट आइनस्टाइन – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(जन्म: १४ मार्च १८७९)

१८९८

चार्ल्स रँड याची हत्या करणारे दामोदर हरी चापेकर यांना फाशी
(जन्म: २४ जून १८६९)



Pageviews

This page was last modified on 27 October 2021 at 12:02am