-: दिनविशेष :-

२२ जून

जगाच्या इतिहासात गाठीच्या प्लेगने अनेकदा हाहा:कार माजवला आहे. उंदरांमुळे होणार्‍या या प्लेगमुळे त्वचेखाली रक्तवाहिन्या फुटून रक्त साकळते. या साकळलेल्या रक्ताचे त्वचेवर काळे डाग दिसू लागतात. परिणामी यातच रुग्णाचा मृत्यू ओढवतो. म्हणून या रोगाने ओढवणार्‍या मृत्यूस काळा मृत्यू असे नाव पडले आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९४

महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर झाले. त्याद्वारे सरकारी व निमसरकारी नोकर्‍यात महिलांना ३० टक्‍के आरक्षण

१९७८

जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

१९७८

जेम्स ख्रिस्ती या खगोलशास्त्रज्ञाने अ‍ॅरिझोना येथील वेधशाळेतून शेरॉन या प्लूटोच्या चंद्राचा शोध लावला.

१९७६

कॅनडाने मृत्यूदंडावर बंदी घातली.

१९४१

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सावरकर सदन येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांची  भेट घेतली.

१९४०

दुसरे महायुद्ध – फ्रान्सने जर्मनीसमोर शरणागती पत्करली.

१९४०

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेसमधुन बाहेर पडुन ‘ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक’ या पक्षाची स्थापना केली.

१९०८

इंग्लंडचा राजा जॉर्ज (पाचवा) याचे राज्यारोहण

१८९७

पुणे शहरात पसरलेल्या प्लेगच्या साथीच्या काळात झालेल्या जुलुमाचा प्रतिशोध म्हणून चार्ल्स रँड या मुलकी अधिकार्‍याला दामोदर हरी चाफेकर यांनी गोळ्या घालून ठार केले.

१७५७

प्लासीची लढाई सुरू झाली.

१६३३

गॅलेलिओ गॅलिली याने पोपच्या दबावाखाली पृथ्वी हाच सूर्यमालेचा केंद्रबिंदू आहे असे कबूल केले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९३२

अमरीश पुरी – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार
(मृत्यू: १२ जानेवारी २००५ - मुंबई, महाराष्ट्र)

१९०८

डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
(मृत्यू: ९ एप्रिल १९९८)

१८९६

बाबूराव पेंढारकर

दामोदर गोपाळ तथा नटवर्य बाबूराव पेंढारकर – मराठी चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि निर्माते, इ.स. १९२० साली त्यांनी ‘सैरंध्री’ या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२०च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांनी पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक, संतपट, कौटुंबिक आणि ग्रामीण अशा ७५ हुन अधिक चित्रपटांत भूमिका केल्या. रंगभुमीवरील ‘झुंजारराव’ ही त्यांची भूमिका विशेष गाजली. ते भालजी पेंढारकरांचे मोठे भाऊ व मास्टर विनायक यांचे सावत्र भाऊ होत.
(मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६७)

(Image Credit: Cinestaan)

१८८७

ज्यूलियन हक्सले – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: १४ फेब्रुवारी १९७५)

१८०५

जोसेफ मॅझिनी – इटालियन स्वातंत्र्यवीर
(मृत्यू: १० मार्च १८७२)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९४

अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव ऊर्फ ‘एल. व्ही. प्रसाद’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक
(जन्म: १७ जानेवारी १९०८)

१९९३

विष्णूपंत जोग – चित्रपट अभिनेते (पहिली मंगळागौर - लता मंगेशकर यांनी अभिनय केलेला पहिला चित्रपट, सरकारी पाहुणे, जय मल्हार, नवरा बायको, देव पावला, बायको पाहिजे, वरदक्षिणा), रंगभूमीवरील अभिनेते (नाटक झाले जन्माचे) (जन्म: ? ? ????)

१९५५

सदाशिव ऊर्फ ‘सदू’ शिंदे – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज. त्यांच्या स्मरणार्थ पुण्यात ‘सदू शिंदे लीग’ क्रिकेट स्पर्धा घेण्यात येतात. शरद पवार यांचे ते सासरे होत.
(जन्म: १८ ऑगस्ट १९२३)Pageviews

This page was last modified on 18 May 2021 at 1:42pm