-: दिनविशेष :-

४ नोव्हेंबर


महत्त्वाच्या घटना:

२००८

बराक ओबामा हे अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बनले.

२०००

हिन्दुस्तानी शास्त्रीय संगीतातील असामान्य कामगिरीबद्दल गायक पं. भीमसेन जोशी यांना ‘आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार‘ जाहीर

१९९६

कलागौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा ‘नाट्यगौरव पुरस्कार’ डॉ. श्रीराम लागू व सत्यदेव दुबे यांना जाहीर

१९४८

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष असलेल्या घटना समितीने घटनेचा मसुदा सादर केला.

१९२२

तुतनखामेन राजाच्या प्रसिद्ध पिरॅमिडमधील कबरस्थानाचे मुख्य द्वार शोधण्यात यश

१९२१

जपानचे पंतप्रधान हारा ताकाशी यांची टोकियो येथे हत्या

१९१८

पहिले महायुद्ध – ऑस्ट्रिया व हंगेरीने इटलीसमोर शरणागती पत्करली

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७१

तब्बू

तब्बू – बॉलीवूड अभिनेत्री

(Image Credit:  @Bollywoodirect)

१९३४

विजया जयवंत तथा विजया मेहता – संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित (१९७५) चित्रपट व नाट्य निर्मात्या, दिग्दर्शिका आणि अभिनेत्या, ‘रंगायन’ या नाट्यसंस्थेच्या सहसंस्थापिका (विजय तेंडुलकर, श्रीराम लागू व अरविंद देशपांडे यांच्यासह). चिं . त्र्यं. खानोलकर लिखित बर्टोल्ड ब्रेख्तच्या ‘ The Caucasian Chalk Circle’ या बोधकथेचं (parable) ‘अजब न्याय वर्तुळाचा‘ हे त्यांनी केलेलं नाट्यरूपांतर बरंच गाजलं. पार्टी (१९८४) या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

१९२९

शकुंतलादेवी – गणितज्ञ, ज्योतिर्विद आणि अतिवेगाने आकडेमोड करणारी भारतीय महिला
(मृत्यू: २१ एप्रिल २०१३)

१९२९

जयकिशन

जयकिशन डाह्याभाई पांचाळ – ‘शंकर-जयकिशन’ या सुप्रसिद्ध संगीतकार जोडीतील संगीतकार
(मृत्यू: १२ सप्टेंबर १९७१)

(Image Credit: Bollywoodirect)

१९२५

ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक
(मृत्यू: ६ फेब्रुवारी १९७६)

१८९४

सीताराम पुरुषोत्तम तथा कर्मवीर अप्पासाहेब पटवर्धन – कोकण गांधी
(मृत्यू: १० मार्च १९७१)

१८८४

जमनालाल बजाज – प्रसिद्ध गांधीवादी कार्यकर्ते, स्वातंत्र्यसैनिक आणि बजाज उद्योगसमुहाचे प्रणेते
(मृत्यू: ११ फेब्रुवारी १९४२)

१८७१

शरदचंद्र रॉय – मानववंशशास्त्रज्ञ. १९१२ ते १९३९ या दरम्यान ओरिसा व बिहारमधील जमातींचा अभ्यास करुन त्यांनी शंभरहून अधिक शोधनिबंध आणि सात ग्रंथ लिहीले.
(मृत्यू: ? ? १९४२)

१८४५

वासुदेव बळवंत फडके – राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी
(मृत्यू: १७ फेब्रुवारी १८८३)

१६१८

औरंगजेब – सहावा मुघल सम्राट
(मृत्यू: ३ मार्च १७०७)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११

दिलीप परदेशी – नाटककार व साहित्यिक
(जन्म: ? ? ????)

२००५

सदाशिव मार्तंड गर्गे – समाजविज्ञान कोशकार
(जन्म: ? ? ????)

१९९९

माल्कम मार्शल

माल्कम मार्शल – वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू
(जन्म: १८ एप्रिल १९५८)

(Image Credit: wikiheights.com)

१९९५

यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते
(जन्म: १ मार्च १९२२)

१९९१

पुरुषोत्तम विश्वनाथ तथा पु. वि. बापट – प्राच्यविद्या संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पाली भाषा कोविद, सिंहली, ब्राम्ही व थाई भाषा तज्ञ, त्यांनी सुमारे १४० शोधनिबंध प्रसिद्ध केले.
(जन्म: १२ जून १८९४)

१९७०

पं. शंभू महाराज – लखनौ घराण्याचे कथ्थक नर्तक
(जन्म: ? ? १९१०)



Pageviews

This page was last modified on 04 November 2021 at 12:12am