कोसोव्होने (सर्बियापासून) स्वातंत्र्य जाहीर केले.
अमेरिकेबरोबरचे युद्ध संपल्यानंतर व्हिएतनामने चीनऐवजी सोविएत युनियन बरोबर राजनैतिक संबंध अधिक वाढवले. व्हिएतनामच्या या चीनविरोधी व सोविएत युनियन धार्जिण्या डावपेचांमुळे चीनने व्हिएतनामवर आक्रमण केले. १६ मार्च १९७९ रोजी चीनने आपले सैन्य काढून घेतले. दोन्ही देशांनी आपणच विजयी झाल्याचे घोषित केले.
अमेरिकन काँग्रेसचे सगळे मतदारसंघ सारख्याच लोकसंख्येचे असले पाहिजेत असा निर्णय अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने दिला.
अमेरिकेत दारुबंदी समाप्त झाली. १९२० साली ही दारुबंदी लागू झाली होती.
वामन गोपाळ जोशी लिखित ‘संगीत रणदुंदुभि’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
इ. स. १८०० मध्ये झालेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत थॉमस जेफरसन व एरन बर यांना सारखीच मते मिळाली होती. हाउस ऑफ रिप्रेझेन्टेटिव्ह्सनी जेफरसन यांना राष्ट्राध्यक्ष तर बर यांना उपाध्यक्ष केले.
पॅरिस हिल्टन – अमेरिकन मॉडेल, अभिनेत्री, गायिका आणि उद्योजक
(Image Credit: Wikipedia)
मायकेल जॉर्डन – अमेरिकन बास्केटबॉलपटू, अभिनेता आणि उद्योजक
(Image Credit: The Guardian)
फ्रेडरिक क्रूप्प – जर्मन उद्योगपती
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९०२)
होरॅस-बेनेडिट्ट डी सास्युरे – ऑस्ट्रियन उमराव, डॉक्टर आणि आधुनिक गिर्यारोहणशास्त्राचे जनक
(मृत्यू: २२ जानेवारी १७९९)
जे. कृष्णमूर्ती – भारतीय तत्त्वज्ञ
(जन्म: ११ मे १८९५)
पुरुषोत्तम शिवराम रेगे – कादंबरीकार, नाटककार, कवी आणि समीक्षक
(जन्म: २ ऑगस्ट १९१०)
राजकीय भूमिका घेऊन इंग्रजांविरुद्ध सशस्त्र उठाव करणारे क्रांतिकारकांचे मेरुमणी क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना एडन येथे निधन
(जन्म: ४ नोव्हेंबर १८४५)
लहुजी राघोजी साळवे ऊर्फ ‘लहुजी वस्ताद’ – क्रांतिकारी, समाजसेवक
(जन्म: ? ? १८११)
सूर्याभोवती पृथ्वी फिरते. सूर्यासारखे अनेक तारे आहेत. त्यांच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्यांच्यावर सजीवसृष्टी असू शकते, असे मत मांडणार्या जिओर्डानो ब्रुनो याला बायबलविरोधी मत मांडल्याबद्दल क्रूसावर बांधून जाळण्यात
आले.
(जन्म: ? ? १५४८)