लता मंगेशकर यांना उत्तर प्रदेशचे राज्यपाल मोतीलाल व्होरा यांच्या हस्ते ‘अवधरत्न’ व ‘साहू सूरसम्मान’ या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
सूक्ष्मजीवशास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल शास्त्रज्ञ पी. एम. भार्गव यांना ‘आर. डी. बिर्ला राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान
बोइंग-७६७ ने पहिले उड्डाण केले.
दुसरे महायुद्ध – जर्मनीने नॉर्वे व डेन्मार्क पादाक्रांत केले.
रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत ‘एक’ मताने मंजुरी मिळाली.
जया भादुरी – अभिनेत्री, राज्यसभा खासदार
लिंडा गुडमन – अमेरिकन ज्योतिषी व लेखिका
(मृत्यू: २१ आक्टोबर १९९५)
राहूल सांकृतायन – इतिहासकार
(मृत्यू: १४ एप्रिल १९६३)
विष्णू गंगाधर तथा ‘दादासाहेब’ केतकर – पुणे विद्यार्थी गृहाचे एक संस्थापक
(मृत्यू: १९ आक्टोबर १९५०)
(Image Credit: PVG Vidya Bhavan)
गणेश वासुदेव जोशी उर्फ ‘सार्वजनिक काका’ – समाजसुधारक, राष्ट्रवादी विचारसरणीचे व स्वदेशी चळवळीचे प्रणेते आणि पुणे सार्वजनिक सभेचे संस्थापक
(मृत्यू: २५ जुलै १८८०)
शुजा-उद-दिन तैमूर उर्फ तैमूरलंग – मंगोल सरदार
(मृत्यू: १८ फेब्रुवारी १४०५)
शक्ती सामंत – हिन्दी व बंगाली चित्रपट दिग्दर्शक व निर्माते
(जन्म: १३ जानेवारी १९२६)
अशोकजी परांजपे – गीतकार
(जन्म: ? ? ????)
बेहराम कॉन्ट्रॅक्टर ऊर्फ ‘बिझी बी’ – पत्रकार व स्तंभलेखक, ‘आफ्टरनून डिस्पॅच अँड कुरियर’ या सायंदैनिकाचे संपादक
(जन्म: ११ आक्टोबर १९३०)
(Image Credit: Alchetron)
शंकरराव रामचंद्र खरात – दलित साहित्यिक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: ११ जुलै १९२१)
(Image Credit: विवेक: महाराष्ट्र नायक)
डॉ. विष्णू भिकाजी तथा वि. भि. कोलते – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू
(जन्म: २२ जून १९०८)
चंद्र राजेश्वर राव – स्वातंत्र्यसैनिक, तेलंगणाच्या लढ्याचे प्रवर्तक, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस
(जन्म: ? ? १९१४)
[वैशाख शु. ६ शके १६१७] पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली. भर्तृहरीच्या शतकत्रयीचा अनुवाद आणि यथार्थदीपिका ही गीतेवरील टीका हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.
(जन्म: ? ? १६०७)
सर फ्रँन्सिस बेकन – इंग्लिश तत्त्ववेत्ते व मुत्सद्दी
(जन्म: २२ जानेवारी १५६१)
This page was last modified on 02 November 2021 at 2:50pm