अहमदाबादमधे झालेल्या २१ बॉम्बस्फोटांमधे ५६ जण ठार तर २०० जण जखमी झाले.
मुंबई परिसरात २४ तासात सुमारे ९९५ मिमी पाऊस झाल्याने शहरात ठिकठिकाणी पूर येऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले.
भारतीय क्रिकेटसाठी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल दिल्या जाणार्या सी. के. नायडू पुरस्कारासाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांची निवड
१९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा ‘चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान
सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना ‘राजीव गांधी सद्भावना पुरस्कार’ जाहीर
मालदीवला (इंग्लंडपासुन) स्वातंत्र्य मिळाले.
जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.
लायबेरिया स्वतंत्र झाला.
इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.
न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य बनले.
खलिद महमूद – बांगलादेशी क्रिकेटपटू
असिफ अली झरदारी – पाकिस्तानचे ११ वे राष्ट्राध्यक्ष
व्हिटास गेरुलायटिस – अमेरिकन लॉन टेनिसपटू
(मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)
वासुदेव गोविंद मायदेव – कवी व समाजसेवक
(मृत्यू: ३० मार्च १९६९)
अल्डस हक्सले – इंग्लिश लेखक
(मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)
पं. कृष्णराव शंकर पंडित – ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ‘राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता.
(मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)
कार्ल युंग – मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ
(मृत्यू: ६ जून १९६१)
जॉर्ज बर्नार्ड शॉ – नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक
(मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)
भास्कर चंदावरकर – संगीतकार
(जन्म: १६ मार्च १९३६)
राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार
(जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)
This page was last modified on 05 June 2021 at 10:03pm