सचिन तेंडुलकर आपल्या कारकिर्दीतील शेवटचा रणजी सामना खेळला. हरयाणाविरुद्ध झालेल्या या सामन्यात सचिनने विजयी फटका मारला.
कॅनडातील क्वेबेक प्रांताने विभक्त होण्यासाठी घेतलेल्या सार्वमतात जनतेने ५०.६% विरुद्ध ४९.४% मतांनी कॅनडातच राहण्याचा निर्णय दिला.
इस्तंबुलमधील बॉस्फरस पूल पूर्ण झाल्यामुळे युरोप आणि आशिया जोडले गेले.
शिवाजी पार्कवर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा झाला.
भारताला संयुक्त राष्ट्रांचे (United Nations) सदस्यत्त्व मिळाले.
लाहोर येथे सायमन कमिशनचा निषेध करणार्या लाला लजपतराय यांच्यावर ब्रिटिश पोलिसांनी लाठीहल्ला केला. त्यातच पुढे १७ नोव्हेंबर १९२८ रोजी त्यांचा अंत झाला.
सिडनी येथे कम्युनिस्ट पार्टी ऑफ ऑस्ट्रेलियाची स्थापना.
‘संगीत संशयकल्लोळ’ नाटकाचा पहिला प्रयोग झाला.
डिएगो मॅराडोना – अर्जेंटिनाचा फूटबॉलपटू (ॲटॅकिंग मिडफिल्डर आणि सेकंड स्ट्रायकर), कप्तान आणि प्रशिक्षक
(मृत्यू: २५ नोव्हेंबर २०२०)
(Image Credit: Getty Images)
प्रमोद व्यंकटेश महाजन – केन्द्रीय संरक्षण मंत्री, माहिती तंत्रज्ञान व दूरसंचार मंत्री, संसदीय कार्यमंत्री, ११ व्या लोकसभेतील खासदार (ईशान्य मुंबई) व राज्यसभा खासदार. भारतीय जनता पक्षाची शिवसेनेबरोबर युती घडवून आणण्यात यांची प्रमुख भूमिका होती.
(मृत्यू: ३ मे २००६ - मुंबई)
(Image Credit: Wikipedia)
डॉ. होमी जहांगीर भाभा – भारतीय पदार्थवैज्ञानिक, भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रणेते, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चचे संस्थापक संचालक
(मृत्यू: २४ जानेवारी १९६६)
(Image Credit: Wikipedia)
सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ‘संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील
(मृत्यू: १० सप्टेंबर १९२३)
(Image Credit: Wikipedia)
विश्वनाथ चिंतामणी तथा विश्राम बेडेकर – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक व दिग्दर्शक. दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर बेतलेली, एक भारतीय तरुण आणि एक जर्मन वंशाची ज्यू तरुणी यांची अदभुतरम्य प्रेमकथा सांगणारी ‘रणांगण’ ही त्यांची एकमेव कादंबरी ही मराठी साहित्यातील मानदंड समजली जाते. मुंबई येथे १९८८ मध्ये झालेल्या ६० व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.
(जन्म: १३ ऑगस्ट १९०६ - अमरावती)
(Image Credit: Library मंत्रा)
प्रभाकर नारायण ऊर्फ ‘भाऊ’ पाध्ये – लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते
(जन्म: २९ नोव्हेंबर १९२६)
सरदार स्वर्ण सिंग – केन्द्रीय मंत्री
(जन्म: १९ ऑगस्ट १९०७)
व्ही. शांताराम – चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते
(जन्म: १८ नोव्हेंबर १९०१)
विनोद मेहरा – अभिनेता
(जन्म: १३ फेब्रुवारी १९४५)
This page was last modified on 29 October 2021 at 11:43pm