मार्क इन्ग्रॅम या स्पर्धकाने फसवणूक करुन इंग्लंडमधील कौन बनेगा करोडपती (Who wants to be a millionaire) ही स्पर्धा जिंकली.
गोमंतक मराठी अकादमीचा पहिला ‘कृष्णदास शामा पुरस्कार’ गोमंतकीय मराठी साहित्यिक बा. द. सातोस्कर यांना तर ‘पंडित महादेवशास्त्री जोशी मराठी साहित्य पुरस्कार’ कवी नारायण सुर्वे यांना जाहीर
जनमत चाचणीत जिब्राल्टरच्या जनतेने स्पेनमधे सामील होण्याऐवजी ब्रिटनमधेच राहण्याचा निर्णय घेतला.
दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांच्या फौजांनी रोम ताब्यात घेण्यास सुरूवात केली.
दुसरे महायुद्ध – कॅनडाने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.
एलियास होवे याला अमेरिकेत शिवणाच्या मशिनचे पेटंट मिळाले.
भक्ती बर्वे - इनामदार – रंगभूमी व चित्रपटसृष्टीतील एक स्वच्छंद अभिनेत्री. सुधा करमरकर यांच्या ‘लिटिल थिएटर’ मधून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.
(मृत्यू: १२ फेब्रुवारी २००१)
(Image Credit: MUBI)
बसप्पा दानप्पा तथा बी. डी. जत्ती – भारताचे ५ वे उपराष्ट्रपती, पाँडेचरी व ओरिसाचे राज्यपाल आणि मैसूर प्रांताचे मुख्यमंत्री, राष्ट्रपती फख्रुद्दीन अली अहमद यांच्या आकस्मिक निधनामुळे जत्ती यांच्यावर राष्ट्रपतीपदाची जबाबदारी आली. सुमारे पाच महिने (११ फेब्रुवारी १९७७ ते २५ जुलै १९७७) ते हंगामी राष्ट्रपती होते.
(मृत्यू: ७ जून २००२)
(Image Credit: राज्यसभा)
गोविंद वल्लभ पंत – स्वातंत्र्यसैनिक, भारताचे दुसरे गृहमंत्री व उत्तर प्रदेशचे पहिले मुख्यमंत्री, भारताचे पहाडी पुरूष, प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्ष, भारतरत्न (१९५७), मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कुमाँऊ परिषदेची स्थापना केली.
(मृत्यू: ७ मार्च १९६१)
श्रीधर पार्सेकर – व्हायोलिन या वाद्यावर विलक्षण हुकूमत असणारा हनहुन्नरी कलाकार, एकल प्रस्तुती व साथसंगत या दोन्हींत त्यांचे सारखेच प्राविण्य होते. व्हायोलिनबरोबरच ते तबला, हार्मोनिअम, जलतरंग आणि क्लॅरिनेटही वाजवत असत. वाकडं पाऊल (१९५६), मर्द मराठा (१९५१), सोन्याची लंका (१९५०), भाग्यरेखा (१९४८), कुबेर (१९४७), भक्त दामाजी (१९४२) इत्यादी चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन तर गोकुळ का राजा (९१५४), अंधोंका सहारा (१९४८), मेरी अमानत (१९४७), नगद नारायण (१९४३) इत्यादी चित्रपटांचे संगीत संयोजन त्यांनी केले.
(जन्म: १ जानेवारी १९२०)
(Image Credit: Vijaya Parrikar Library)
सुकुमार रॉय – बंगाली साहित्यिक आणि ‘संदेश’ या लहान मुलांच्या मासिकाचे संस्थापक, चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रॉय यांचे वडील
(जन्म: ३० आक्टोबर १८८७)
(Image Credit: Wikipedia)
रावबहादूर डॉ. विश्राम रामजी घोले – महात्मा फुले यांचे सहकारी, निष्णात शल्यविशारद आणि उदारमतवादी समाजसुधारक, सत्यशोधक समाजाचे दुसरे अध्यक्ष, पुणे नगरपालिकेचे १६ वर्ष नियुक्त सभासद, व्हॉइसरॉयचे मानद शल्यचिकित्सक
(जन्म: ? ? ????)
This page was last modified on 09 September 2021 at 1:22pm