-: दिनविशेष :-

१५ मार्च

जागतिक ग्राहक हक्क दिन

World Consumer Rights Day


महत्त्वाच्या घटना:

२००३

हू जिंताओ चीनच्या अध्यक्षपदी

१९९०

सोविएत संघाने लिथुआनियाचे स्वातंत्र्य नाकारले.

१९८५

symbolics.com हे internet वरील पहिले .com संकेत स्थळ (Domain Name) नोंदले गेले. वेरिसाईनच्या २०२० अखेरच्या आकडेवारीनुसार सध्या जगात सुमारे ३६६, ३००, ००० इतक्या संकेतस्थळांची नोंदणी झालेली आहे. आणि त्यात रोज सुमारे दहा लाख संकेतस्थळांची भर पडत आहे.

१९६१

ब्रिटिश राष्ट्रकुलातून दक्षिण अफ्रिका बाहेर पडली.

१९५६

ब्रॉडवेवरील मार्क हेलिंगर थिएटर येथे ‘माय फेअर लेडी’चा पहिला प्रयोग झाला.

१९३९

दुसरे महायुद्ध – जर्मनीने झेकोस्लोव्हाकिया गिळंकृत केले.

१९१९

हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठाचे उद्‍घाटन

१९०६

रोल्स रॉईस कंपनीची स्थापना झाली.

१८७७

इंग्लंड व ऑस्ट्रेलियात पहिला क्रिकेट कसोटी सामना सुरू झाला.

१८३१

मराठीतील पहिले छापील पंचांग विक्रीस उपलब्ध झाले.

१८२७

टोरांटो विद्यापीठाची स्थापना झाली.

१८२०

मेन हे अमेरिकेचे २३ वे राज्य बनले.

१६८०

छत्रपती शिवाजी महाराजांचे द्वितीय पुत्र राजाराम यांचा ताराबाई या प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी विवाह

१५६४

मुघल सम्राट अकबर याने हिंदुंवरील जिझीया कर रद्द केला.

१४९३

भारत शोधल्याच्या आनंदात कोलंबस पहिल्या भारत शोध मोहिमेवरुन स्पेनला परतला. प्रत्यक्षात तो भारतात पोहोचलाच नव्हता तर वेस्ट इंडिजवरुन परत गेला होता.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९०१

विजयपाल लालाराम तथा ‘गुरू हनुमान’ – पद्मश्री आणि द्रोणाचार्य पुरस्कार विजेते कुस्ती प्रक्षिशक
(मृत्यू: २४ मे १९९९)

१८६०

डॉ. वाल्डेमर हाफकिन – प्लेग व कॉलरा प्रतिबंधक लशीचा शोध लावणारे सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
(मृत्यू: २६ आक्टोबर १९३०)

१७६७

अँड्र्यू जॅक्सन – अमेरिकेचे ७ वे राष्ट्राध्यक्ष
(मृत्यू: ८ जून १८४५)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०००

लेडी राणू मुखर्जी – विचारवंत आणि कलासमीक्षक, रविंद्रनाथ टागोर यांच्या जवळच्या सहकारी

१९९२

डॉ. राही मासूम रझा – हिन्दी व ऊर्दू कवी, गीतकार व शायर, ‘महाभारत’ या दूरदर्शनवरील अत्यंत गाजलेल्या मालिकेचे संवादलेखक
(जन्म: १ ऑगस्ट १९२७)

१९३७

व्यंकटेश बळवंत ऊर्फ बापूराव पेंढारकर – रंगभूमीवरील अभिनेते व गायक
(जन्म: १० डिसेंबर १८९२)

ख्रिस्त पूर्व ४४

रोमन सिनेटमध्ये मर्कस जुनियस ब्रुटस, डेसिमस जुनियस ब्रुटस व इतर सेनेटरांनी रोमन सम्राट ज्यूलियस सीझर याची हत्या केली. Et tu, Brute? (You too, Brutus?, ब्रुटस तू सुद्धा?) हे त्याचे अखेरचे उद्‍गार प्रसिद्ध आहेत.
(जन्म: ख्रिस्त पूर्व १००)



Pageviews

This page was last modified on 24 May 2021 at 11:08pm