-: दिनविशेष :-

२३ जुलै

वनसंवर्धन दिन


महत्त्वाच्या घटना:

१९९९

केनेडी अवकाश केंद्रावरुन (Kennedy Space Center) कोलंबिया यानाचे यशस्वी उड्डाण. या यानातील अंतराळवीरांनी ‘चंद्रा’ ही अवकाशातील सर्वात मोठी दुर्बिण प्रक्षेपित केली.

१९८६

जैव‍अभियांत्रिकी तंत्रज्ञान वापरुन जगात सर्वप्रथम तयार केलेल्या ‘हेपेटायटिस-बी’ या रोगावरील लशीच्या वापरास अमेरिकेत परवानगी मिळाली.

१९८३

एल.टी.टी.ई. ने श्रीलंकेच्या १३ सैनिकांची हत्या केली. याचा वचपा म्हणून श्रीलंकेच्या सरकारने तमिळवंशीय नागरिकांवर हल्ला केला. जुलै महिन्यात १,००० नागरिक ठार झाले, तर १,००,००० नागरिकांनी भारत, युरोप आणि कॅनडात पलायन केले. येथूनच श्रीलंकेच्या नागरी युद्धाला सुरुवात झाली.

१९८३

माँट्रिअलहुन एडमंटनला जाणाऱ्या एअर कॅनडा फ्लाइट १४३ या बोईंग ७६७ - २३३ विमानातील इंधन अचानक संपले. वैमानिकांनी अतिकुशलतेने विमान तसेच झेपावत गिमली, मॅनिटोबा येथे उतरवले. (या घटनेची चित्रफित पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

१९८२

‘इंटरनॅशनल व्हेलिंग कमिशन’ ने व्हेल माशांच्या व्यापारी पद्धतीच्या मासेमारीवर १९८५-८६ पर्यंत बंदी घालण्याचा निर्णय घेतला.

१९२९

इटलीतील फासिस्ट सरकारने परकीय शब्दांच्या वापरावर बंदी घातली.

१९२७

मुंबईत ‘रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. यात इंग्रजी भाषेतुन बातम्या देण्यात आल्या. याचेच पुढे ‘आकाशवाणी’ (All India Radio) मधे रुपांतर झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७६

ज्यूडीथ पोल्गार – हंगेरीची बुद्धीबळपटू

१९४७

डॉ. मोहन आगाशे – अभिनेते व मानसोपचारतज्ञ

१९२७

गानयोगीनी धोंडुताई कुलकर्णी – जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायिका
(मृत्यू: १ जून २०१४)

१९१७

लक्ष्मीबाई यशवंत तथा ‘माई’ भिडे – नाट्य-चित्रपट अभिनेत्री
(मृत्यू: ? ? ????)

१९०६

चंद्रशेखर आझाद – स्वातंत्र्यलढ्यातील आघाडीचे क्रांतिकारक
(मृत्यू: २७ फेब्रुवारी १९३१

१८८६

वॉल्टर शॉटकी – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ
(मृत्यू: ४ मार्च १९७६)

१८५६

लोकमान्य बाळ (केशव) गंगाधर टिळक – समाजसुधारक आणि प्रखर राष्ट्रवादी, भगव्‌दगीतेचे भाष्यकार
(मृत्यू: १ ऑगस्ट १९२० - मुंबई)

Best Offers on Electronics and Acessories
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१२

लक्ष्मी सहगल – आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन
(जन्म: २४ आक्टोबर १९१४)

२००४

महमूद – विनोदी अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता
(जन्म: २९ सप्टेंबर १९३२)

१९९९

दामोदर तात्याबा तथा दादासाहेब रुपवते – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते
(जन्म: २८ फेब्रुवारी १९२५ - अकोले, अहमदनगर)

१९९७

वसुंधरा पंडित – गायिका
(जन्म: ? ? ????)

१८८५

युलिसिस ग्रांट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष
(जन्म: २७ एप्रिल १८२२)



Pageviews

This page was last modified on 26 April 2021 at 3:18pm