हा या वर्षातील १३६ वा (लीप वर्षातील १३७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००७ : निकोलाय सारकॉझी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले.
२००५ : कुवेतमधे स्त्रियांना प्रथमच मतदानाचा हक्क प्राप्त झाला.
२००० : बॅडमिंटन अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी तसेच खेळांचे दूरचित्रवाणी प्रसारण सुलभ करण्यासाठी या खेळातील गेम १५ ऐवजी ७ गुणांचा करण्याचा निर्णय आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन महासंघाच्या क्‍वालालंपूर येथील बैठकीत घेण्यात आला. मात्र २००६ मधे हा नियम परत बदलला गेला.
१९९६ : भारताचे १० वे पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी सूत्रे हाती घेतली. मात्र आवश्यक पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांचे सरकार केवळ १३ दिवस टिकले.
१९९३ : बचेन्द्री पालच्या नेतृत्वाखालील पहिल्या महिला भारतीय मोहिमेने सात मुलींसह अठरा गिर्यारोहकांना एव्हरेस्ट पादाक्रांत करण्याचा मान मिळवून दिला व नवा जागतिक विक्रम नोंदविला.
१९७५ : सिक्कीम भारतात विलीन झाले.
१९७५ : जपानची जुंको तबेई ही माऊंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला बनली.
१९६९ : सोविएत रशियाचे ’व्हेनेरा-५’ हे मानवविरहित अंतराळयान शुक्रावर उतरले.
१९२९ : हॉलिवूडच्या ’अ‍ॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर, आर्ट्‌स अँड सायन्सेस’या संस्थेतर्फे चित्रपटांतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्मृतिचिन्ह देण्याचा पहिला समारंभ झाला. याच पारितोषिकांना पुढे ’ऑस्कर’ असे नाव पडले.
१८९९ : क्रांतिकारक बाळकृष्ण चाफेकर यांना फाशी
१६६५ : पुरंदर किल्ल्यास दिलेरखानाने घातलेला वेढा तोडण्याच्या प्रयत्‍नात मुरारबाजीचा मृत्यू

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७० : गॅब्रिएला सॅबातिनी – अर्जेंटिनाची टेनिस खेळाडू
१९३१ : के. नटवर सिंह – भारतीय राजकारणी व परराष्ट्रमंत्री
१९२६ : माणिक वर्मा – शास्त्रीय संगीत व सुगम संगीत या दोन्ही क्षेत्रांत लोकप्रियता मिळवलेल्या गायिका. ’वंदे मातरम’, ’सीता स्वयंवर’, ’मायाबाजार’, ’गुळाचा गणपती’, ’पुढचं पाऊल’ या चित्रपटांसाठीहि त्यांनी पार्श्वगायन केले. ’वाजई पावा गोविंद’, ’त्या चित्तचोरट्याला’, ’अमृताहुनी गोड’ इ. त्यांची अनेक गीते लोकप्रिय आहेत. (मृत्यू: १० नोव्हेंबर १९९६)
१९०५ : हेन्‍री फोंडा – अमेरिकन अभिनेते (मृत्यू: १२ ऑगस्ट १९८२)
१८२५ : केरुनाना लक्ष्मण छत्रे – आद्य गणिती, आधुनिक भास्कराचार्य (मृत्यू: १९ मार्च १८८४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१४ : रुसी मोदी – टाटा स्टीलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, पद्मभूषण (१९८९) (१७ जानेवारी १९१८)
१९९४ : माधव मनोहर – साहित्य समीक्षक, विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे एकमेव मानकरी. ’अन्नदाता’, ’एक आणि दोन’, ’एका रात्रीची गोष्ट’ या त्यांच्या अनुवादित कादंबर्‍या वैशिष्ट्यपूर्ण आहेत. (जन्म: ? ? ????)
१९९४ : फणी मुजुमदार – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथा लेखक. दूरदर्शनवर लोकप्रिय झालेल्या ’रामायण’ या मालिकेची पटकथा त्यांनी लिहिली होती. चित्रपटसृष्टीतील सहा दशकांच्या वाटचालीत त्यांनी केवळ हिन्दीतच नव्हे तर चिनी, बंगाली, मल्याळी, उडिया व इंग्रजी चित्रपटांच्या निर्मितीत मोठे नाव कमावले. (जन्म: २८ डिसेंबर १९११ - फरिदपूर, बांगला देश)
१९५० : अण्णासाहेब लठ्ठे – कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री (जन्म: ९ डिसेंबर १८७८)
१८३० : जोसेफ फोरियर – फ्रेन्च गणितज्ञ व भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: २१ मार्च १७६८)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 17 May, 2014 13:28