हा या वर्षातील २४ वा दिवस आहे.

         इंग्लंडचे थोर नेते विन्स्टन चर्चिल म्हणजे जगातला सर्वाधिक भाग्यवान राजकारणी! वयाच्या २६ व्या वर्षीच ते संसदेवर निवडून आले. वयाच्या ३२ व्या वर्षी मंत्री झाले. दोनदा पंतप्रधान झाले. थोडे अपवाद वगळता १९०६ ते १९५५ या सर्व काळात ते मंत्री होते. सत्तेवर राहणे शक्य असतानाही वयाच्या ८० व्या वर्षी ते निवृत्त झाले. विन्स्टन चर्चिल

महत्त्वाच्या घटना:

१९८४ : अ‍ॅपल मॅकिन्टॉश कॉम्प्युटर्सची विक्री सुरू झाली.
१९७६ : ’बर्मा शेल’ या ब्रिटिश तेलकंपनीचे राष्ट्रीयीकरण करुन तिचे नाव ’भारत रिफायनरीज’ असे ठेवण्यात आले. पुढे १ ऑगस्ट १९७७ रोजी त्या कंपनीचे नाव बदलून ’भारत पेट्रोलियम’ (BPCL) असे करण्यात आले.
१९७२ : गुआममध्ये इ. स. १९४४ पासून लपलेला जपानी सैनिक, शोइची योकोइ सापडला. त्याला दुसरे महायुद्ध संपलेले माहितीच नव्हते.
१९६६ : भारताच्या तिसर्‍या पंतप्रधान म्हणून इंदिरा गांधी यांचा शपथविधी झाला.
१९६६ : एअर इंडियाचे 'कांचनगंगा' हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतातील माँट ब्लँक या शिखरावर कोसळले. या अपघातात भारतातील अणूविज्ञानाचे शिल्पकार डॉ. होमी जहांगीर भाभा यांचे निधन झाले.
१९४३ : पुण्यातील कॅपिटॉल चित्रपटगृहात बॉम्बस्फोट होऊन चार जण ठार
१९४२ : दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी बँकॉकवर बॉम्बहल्ला केला. यामुळे थायलँडला इंग्लंड व अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारणे भाग पडले.
१९१६ : नागरी स्वातंत्र्यावर आक्रमण होते या कारणामुळे अमेरिकन सर्वोच्‍च न्यायालयाने प्राप्तिकर घटनाबाह्य ठरविला.
१९०१ : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला.
१८६२ : बुखारेस्ट ही रुमानियाची राजधानी करण्यात आली.
१८५७ : दक्षिण आशियातील पहिल्या विद्यापीठाची कोलकाता येथे स्थापना झाली.
१८४८ : कॅलिफोर्निया गोल्डरश – कॅलिफोर्नियातील सटर्स मिल येथे एका ओढ्यात जेम्स मार्शल नावाच्या माणसाला मोठ्या प्रमाणात सोने सापडले. या बातमीमुळे जगभरातून लाखो लोक सोने मिळवण्यासाठी कॅलिफोर्नियात दाखल होऊ लागले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४३ : सुभाष घई – हिन्दी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व पटकथालेखक
१९२४ : मेघश्याम पुंडलिक तथा मे. पुं. रेगे – तत्त्वचिंतक, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष (मृत्यू: २८ डिसेंबर २००० - मुंबई)
१९२४ : रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर – मराठी व हिन्दी चित्रपट अभिनेत्री (सांगत्ये ऐका, लोकशाहीर रामजोशी, विजयाची लग्ने, संतसखू, रामशास्त्री, आजाद, नवजीवन, धन्यवाद, मेरे लाल). ’सांगत्ये ऐका’ नावाचे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०११ : स्वरभास्कर पण्डित भीमसेन जोशी – शास्त्रीय गायक (जन्म: ४ फेब्रुवारी १९२२)
२००५ : अनुताई लिमये – गोवा मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा यात सक्रीय सहभाग घेणार्‍या स्वातंत्र्यसेनानी आदिवासी महिला व बालकांच्या कल्याणासाठी झटणार्‍याव सामाजिक कार्यकर्त्या (जन्म: ? ? ????)
१९६६ : एअर इंडियाचे ’कांचनगंगा’ हे विमान युरोपातील आल्प्स पर्वतात कोसळुन भारतीय भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा मृत्यूमुखी पडले. (जन्म: ३० आक्टोबर १९०९)
१९६५ : विन्स्टन चर्चिल – दुसर्‍या महायुद्धकाळातील ब्रिटनचे पंतप्रधान, साहित्यिक, वृत्तपत्रकार, थोर राजकारणी आणि नोबेल पारितोषिक विजेते (जन्म: ३० नोव्हेंबर १८७४)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Sunday, 16 February, 2014 21:17