हा या वर्षातील ३४५ वा (लीप वर्षातील ३४६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००१ : चीनचा वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन (WTO) मधे प्रवेश
१९९४ : अध्यक्ष बोरिस येल्त्सिन यांच्या आदेशावरुन रशियन फौजांनी चेचेन्यामधे प्रवेश केला.
१९७२ : अपोलो मोहिमेतील अपोलो १७ हे सहावे चांद्रयान चंद्रावर उतरले.
१९६७ : कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली.
१९४६ : युनिसेफ (UNICEF) ची स्थापना
१९४१ : दुसरे महायुद्ध – जर्मनी व इटली यांनी अमेरिकेविरुद्ध युद्ध पुकारले.
१९३० : सी. व्ही. रमण यांना नोबेल पारितोषिक
१८१६ : इंडियाना हे अमेरिकेचे १९ वे राज्य बनले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९६९ : विश्वनाथन आनंद – भारतीय ग्रँडमास्टर व विश्वविजेता
१९४२ : आनंद शंकर – प्रयोगशील संगीतकार (मृत्यू: २६ मार्च १९९९)
१९३१ : भगवान श्री रजनीश (मृत्यू: १९ जानेवारी १९९०)
१९२९ : सुभाष गुप्ते – लेगस्पिनर (मृत्यू: ३१ मे २००२)
१९२५ : राजा मंगळवेढेकर – बालसाहित्यकार (मृत्यू: १ एप्रिल २००६)
१९२२ : मोहम्मद युसुफ खान ऊर्फ दिलीपकुमार – चित्रपट अभिनेता, पद्मभूषण (१९९१), दादासाहेब फाळके पुरस्कार (१९९४), राज्यसभा खासदार, मुंबईचे नगरपाल
१९१५ : मधुकर दत्तात्रय तथा बाळासाहेब देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक (मृत्यू: १७ जून १९९६)
१९०९ : नारायण गोविंद कालेलकर – साहित्य अकादमी पारितोषिक विजेते (१९६८) भाषाशास्त्रज्ञ (मृत्यू: ? ? ????)
१८९९ : पु. य. देशपांडे – कादंबरीकार व तत्त्वचिंतक (मृत्यू: ? ? ????)
१८९२ : अयोध्या नाथ खोसला – स्थापत्य अभियंते, पाटबंधारे व जलनिस्सारण आयोगाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९५४), रुरकी विद्यापीठाचे कुलगुरू (१९५४ - १९५९), राज्यसभा खासदार (१९५८ - १९५९), योजना आयोगाचे अध्यक्ष (१९५९), राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष (१९६१ - १९६२), ओरिसाचे राज्यपाल (१९६२ - १९६६), पद्मविभूषण (१९७७)
१८८२ : सुब्रम्हण्यम भारती – तामिळ साहित्यिक (मृत्यू: ११ सप्टेंबर १९२१)
१८६७ : ’उपन्यास सम्राट’ रजनीकांत बर्दोलोई – आसामी कादंबरीकार, आसामी ऐतिहासिक कादंबरीचे जनक (मृत्यू: २५ मार्च १९४०)
१८४३ : रॉबर्ट कोच – क्षयरोगावरील मूलभूत संशोधनासाठी १९०५ मध्ये नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन डॉक्टर (मृत्यू: २७ मे १९१०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४ : एम. एस. सुब्बुलक्ष्मी – विख्यात शास्त्रीय गायिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१६)
२००२ : नानाभॉय अर्देशीर ऊर्फ ’नानी’ पालखीवाला – कायदेपंडित आणि अर्थतज्ञ (जन्म: १६ जानेवारी १९२०)
२००१ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (जन्म: १७ मार्च १९०९)
१९९८ : रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो‘ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी (जन्म: ६ फेब्रुवारी १९१५)
१९८७ : गुरूनाथ आबाजी तथा जी. ए. कुलकर्णी – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते गूढकथालेखक (जन्म: १० जुलै १९२३)
१७८३ : रघुनाथराव पेशवा (जन्म: १८ ऑगस्ट १७३४)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 28 February, 2014 13:17