-: दिनविशेष :-

१७ जून


महत्त्वाच्या घटना:

१९९१

भारताचे पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल आणि पंतप्रधान राजीव गांधी यांना मरणोत्तर ‘भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान जाहीर

१९६७

चीनने पहिल्या हायड्रोजन बॉम्बचा स्फोट केला.

१९६३

अमेरिकेच्या सर्वोच्‍च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.

१९४४

आइसलँडने (डेन्मार्कपासुन) आपण स्वतंत्र असल्याचे घोषित केले आणि ते प्रजासत्ताक बनले.

१९४०

दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी फ्रान्समधुन माघार घेण्यास सुरूवात केली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८१

शेन वॉटसन – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू

१९७३

लिअँडर पेस – भारतीय लॉनटेनिसपटू

१९०३

बाबूराव विजापुरे – नाटककार, संगीतशिक्षक, भरत नाट्य मंदिरचे कार्यवाह
(मृत्यू: ७ डिसेंबर १९८२)

१२३९

एडवर्ड (पहिला) – इंग्लंडचा राजा
(मृत्यू: ७ जुलै १३०७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९६

मधुकर दत्तात्रय तथा ‘बाळासाहेब’ देवरस – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे सरसंघचालक
(जन्म: ११ डिसेंबर १९१५)

१९९१

">प्रभाकर माचवे – साहित्यिक. त्यांनी हिंदी, मराठी व इंग्रजीत शंभराहून अधिक ग्रंथ लिहिले. त्यांच्या साहित्यामध्ये स्वप्‍नभंग, अनुक्षण, मेपल हे काव्यसंग्रह; एक तारा, दर्दके पाबंद इ. कादंबर्‍या; नाट्यचर्चा, समीक्षा की समीक्षा आदींचा समावेश आहे.
(जन्म: २६ डिसेंबर १९१७)

१९८३

शरद पिळगावकर – चित्रपट निर्माते, लेखक, दिग्दर्शक व वितरक. सव्वा शेर (१९८४), चोरावर मोर (१९८०), अष्टविनायक (१९७९), नाव मोठं लक्षण खोटं (१९७७) इ. चित्रपटांचे निर्माते, जागृती (१९७७), खून का रिश्ता (१९८१) इ. चित्रपटांचे लेखक (जन्म: ? ? ????)

१९६५

मोतीलाल राजवंश ऊर्फ ‘मोतीलाल’ – आपल्या ऐटबाज व्यक्तिमत्त्वाने व सहजसुंदर अभिनयाने रसिकांवर मोहिनी घालणारे अभिनेते
(जन्म: ४ डिसेंबर १९१०)

१९२८

पण्डित गोपबंधूदास तथा ‘उत्कलमणी’ – ओरिसातील समाजसुधारक, सामाजिक कार्यकर्ते, स्वातंत्र्यसेनानी, कवी व लेखक
(जन्म: ९ आक्टोबर १८७७)

१८९५

गोपाळ गणेश आगरकर – लोकमान्य टिळकांचे सहकारी व ‘केसरी’चे पहिले संपादक, डेक्‍कन एज्युकेशन सोसायटीचे एक संस्थापक व फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य, समाजसुधारक, विचारवंत व शिक्षणतज्ञ, ‘सुधारक’ या वृत्तपत्राचे संस्थापक व संपादक
(जन्म: १४ जुलै १८५६)

१६७४

राजमाता जिजाबाई
(जन्म: १२ जानेवारी १५९८)

१२९७

संत निवृत्तीनाथांनी समाधी घेतली
(जन्म: २९ जानेवारी १२७४)


Pageviews

This page was last modified on 07 May 2021 at 7:17pm