हा या वर्षातील ७६ वा (लीप वर्षातील ७७ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९७ : मुंबईत वातानुकुलित टॅक्सी सेवेचा शुभारंभ
१९६९ : गोल्डा मायर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.
१९५८ : ’व्हॅनगार्ड-१’ या अमेरिकेच्या पहिल्या, एकूण चौथ्या आणि पहिल्या सौरऊर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७९ : शर्मन जोशी – अभिनेता
१९२७ : ’विश्वास’ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुत्र (मृत्यू: ? ? ????)
१९२० : शेख मुजीबुर रहमान – बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: १५ ऑगस्ट १९७५)
१९०९ : रामचंद्र नारायण दांडेकर – भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (मृत्यू: ११ डिसेंबर २००१)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००० : ’राजकुमारी’ दुबे – पार्श्वगायिका व अभिनेत्री (जन्म: ? ? १९२४)
१९५७ : रॅमन मॅगसेसे – फिलिपाइन्सचे ७ वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)
१९५६ : आयरिन क्यूरी – नोबेल पारितोषिक विजेत्या फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)
१९३७ : ’चंद्रशेखर’ शिवराम गोर्‍हे – बडोद्याचे राजकवी, ’गोदागौरव’ आणि ’कविता रति’ ही त्यांची विशेष गाललेली काव्ये आहेत. (जन्म: २६ जानेवारी १८९१)
१९१० : अनुताई वाघ – समाजसेविका (जन्म: २७ सप्टेंबर १९९२)
१८८२ : विष्णूशास्त्री चिपळूणकर – आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि ’केसरी’चे एक संस्थापक. चित्रशाळा, आर्यभूषण छापखाना, किताबघर यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्यांनी सुरू केले. (जन्म: २० मे १८५०)
१७८२ : डॅनियल बर्नोली – डच गणितज्ञ (जन्म: ८ फेब्रुवारी १७००)
१२१० : आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) यांनी सातारा जिल्ह्यात मत्स्येन्द्रगड येथे समाधी घेतली. [चैत्र व. ५] (जन्म: ? ? ????)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 13 February, 2014 13:55