-: दिनविशेष :-

६ फेब्रुवारी


महत्त्वाच्या घटना:

१९५२

इंग्लंडचा राजा जॉर्ज (सहावा) यांचे निधन झाले आणि एलिझाबेथ (दुसरी) गादीवर बसली. ती राणी बनल्याची बातमी तिला केनियातील झाडावरच्या एका हॉटेलमधे देण्यात आली.

१९४२

दुसरे महायुद्ध – इंग्लंडने थायलँडविरुद्ध युद्ध पुकारले.

१९३२

कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात छत्री संघाची सदस्य असलेल्या बीना दास या विद्यार्थिनीने बंगालचे राज्यपाल स्टॅन्ले जॅक्सन यांच्यावर गोळया झाडल्या.

१९१८

३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले.

१६८५

जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८३

श्रीशांत – क्रिकेटपटू, सट्टेबाज, तथाकथित ‘फिक्सर’ आणि भारतीय जनता पक्षाचा नेता

१९५२

डॉ. रिक चार्ल्सवर्थ – ऑस्ट्रेलियन हॉकीपटू, हॉकी प्रशिक्षक, क्रिकेटपटू आणि राजकारणी

१९१५

रामचंद्र नारायण द्विवेदी ऊर्फ कवी प्रदीप – ‘ए मेरे वतन के लोगो’ या गाण्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या काळजाला भिडणार्‍या रचनेमुळे आपले वेगळेपण ठसविणारे आधुनिक राष्ट्रकवी
(मृत्यू: ११ डिसेंबर १९९८)

१९११

रोनाल्ड रेगन – अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष (मृत्यू: ५ जून २००४)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००१

बॅ. विठ्ठलराव गाडगीळ – केन्द्रीय नभोवाणी मंत्री व काँग्रेसचे प्रवक्ते
(जन्म: ? ? ????)

१९९३

आर्थर अ‍ॅश – अमेरिकन टेनिस खेळाडू
(जन्म: १० जुलै १९४३)

१९७६

ऋत्विक घटक – चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक
(जन्म: ४ नोव्हेंबर १९२५)

१९५२

जॉर्ज (सहावा) – इंग्लंडचा राजा
(जन्म: १४ डिसेंबर १८९५)

१९३९

सर सयाजीराव गायकवाड (तिसरे) – बडोद्याचे महाराज, सुधारणावादी संस्थानिक, पडदा पद्धती, बालविवाह, कन्याविक्रय यांना बंदी घालणारे कायदे केले. विधवा विवाहाला संमती दिली.
(जन्म: १० मार्च १८६३)

१९३१

मोतीलाल नेहरू
आयुष्याच्या उत्तरार्धातील छायाचित्र

मोतीलाल गंगाधर नेहरू – भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित
(जन्म: ६ मे १८६१)

(Image Credit: विकिपीडिया)

१८०४

जोसेफ प्रिस्टले – इंग्लिश रसायनशास्रज्ञ
(जन्म: १३ मार्च १७३३)


Pageviews

This page was last modified on 06 May 2021 at 1:29pm