हा या वर्षातील ९७ वा (लीप वर्षातील ९८ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

१९९६ : सिंगर करंडक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेचा फलंदाज सनत जयसूर्या याने केवळ १७ चेंडुत अर्धशतक झळकावण्याचावि विश्व विक्रम केला.
१९८९ : लठ्ठा नावाची विषारी दारू प्यायल्याने बडोदा येथे १२८ जणांचा बळी गेला. विषारी दारुच्या बळींची ही मोठी दुर्घटना होती.
१९४८ : जागतिक स्तरावर स्वास्थ्य आणि आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे (United Nations) जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) स्थापना झाली. व्यक्तिगत आणि सामाजिक आरोग्याची लोकांना जाणीव करुन देण्यासाठी हा दिवस ’जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो.
१९४० : पोस्टाचे तिकीट निघणारे बुकर टी. वॉशिंग्टन हे पहिले कृष्ण्वर्णीय अमेरिकन ठरले.
१९३९ : दुसरे महायुद्ध – इटालीने अल्बेनिया पादाक्रांत केले.
१९०६ : माऊंट व्हेसुव्हियस या ज्वालामुखीचा उद्रेक होऊन नेपल्स शहर बेचिराख झाले.
१८७५ : आर्य समाजाची स्थापना झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४२ : जितेंद्र – चित्रपट अभिनेता
१९३८ : काशीराम राणा – भाजपाचे लोकसभा सदस्य (मृत्यू: ३१ ऑगस्ट २०१२)
१९२५ : चतुरानन मिश्रा – केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते, कम्युनिस्ट पक्षाचे नेते (मृत्यू: २ जुलै २०११)
१९२० : पण्डित रवी शंकर – सतार वादक, ’भारतरत्‍न’ (मृत्यू: १२ डिसेंबर २०१२)
१८९१ : सर डेविड लो – जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार (मृत्यू: १९ सप्टेंबर १९६३ - लंडन, इंग्लंड)
१८६० : विल केलॉग – ’केलॉग्ज’ चा मालक (मृत्यू: ६ आक्टोबर १९५१)
१७७० : विल्यम वर्डस्वर्थ – काव्यातील स्वच्छंदतावादाचे प्रणेते इंग्लिश कवी. त्यांची ’डॅफोडिल्स’ ही अतिशय गाजलेली कविता आहे. (मृत्यू: २३ एप्रिल १८५०)
१५०६ : सेंट फ्रान्सिस झेविअर – ख्रिस्ती धर्मप्रसारक. यांनी भारत व जपानमधे हजारो लोकांना ख्रिस्ती धर्माची दीक्षा दिली. गोव्यातील ’ओल्ड चर्च’मधे यांचेच शव अजून जपून ठेवण्यात आले आहे. (मृत्यू: ३ डिसेंबर १५५२ - साओ जोआओ, चीन)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००४ : केलुचरण महापात्रा – प्रसिद्ध ओडिसी नर्तक (जन्म: ८ जानेवारी १९२६)
२००१ : गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी. एन. रामचंद्रन – संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ (Biophysicist). वैज्ञानिकांना मिळणारे बहुतेक सर्व राष्ट्रीय सन्मान त्यांना मिळाले. (जन्म: ८ आक्टोबर १९२२ - एर्नाकुलम, केरळ)
१९७७ : राजा बढे – संपादक, चित्रपट अभिनेते, लेखक, नाटककार, कादंबरीकार, कथाकथनकार, गायक, कवी आणि गीतकार (जन्म: १ फेब्रुवारी १९१२)
१९४७ : हेन्‍री फोर्ड – फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (जन्म: ३० जुलै १८६३)
१९३५ : डॉ. शंकर आबाजी भिसे – भारताचे 'एडिसन' (जन्म: २९ एप्रिल १८६७)
१४९८ : चार्ल्स (आठवा) – फ्रान्सचा राजा (जन्म: ३० जून १४७०)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 19 April, 2014 18:04