हा या वर्षातील ३२५ वा (लीप वर्षातील ३२६ वा) दिवस आहे.

       'English' ही जगात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. ती इंडो-युरोपिअन कुटुंबाच्या जर्मेनिक गटातील भाषा आहे. तिचे ’इंग्रजी’ हे मराठीतील नाव पोर्तुगीज भाषेतून घेतले आहे. मुळात इंग्लंडची असणारी ही भाषा इंग्लंडच्या ताब्यात असणार्‍या जगातील अनेक भागांत पसरली आहे. आजही भारतातील अरुणाचल प्रदेश व नागालँड या राज्यांची ती राजभाषा आहे! भाषिक सुसंवाद

महत्त्वाच्या घटना:

१९७२ : दक्षिण कोरियाने नवीन संविधान अंगीकारले.
१९७१ : बांगलादेश मुक्ती संग्राम – भारतीय सैन्य व बांगलादेश मुक्ती वाहिनी यांनी गरीबपूरच्या लढाईत पाकिस्तानी सैन्याचा दारुण पराभव केला.
१९६२ : भारत चीन युद्ध – भारतीय प्रदेशावर आक्रमण करणार्‍या चीनने १९ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेली एकतर्फी युद्धबंदी अमलात आली.
१९४२ : राजा नेने दिग्दर्शित ’दहा वाजता’ हा ’प्रभात’चा चित्रपट मुंबईत प्रदर्शित झाला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

ईशा करवडे शं. ना. नवरे प्रेम नाथ व्होल्टेअर
ईशा करवडे शं. ना. नवरे प्रेम नाथ व्होल्टेअर
१९८७ : ईशा करवडे – भारतीय बुद्धीबळपटू
१९२७ : शं. ना. नवरे – लेखक (मृत्यू: २५ सप्टेंबर २०१३)
१९२६ : प्रेम नाथ – हिन्दी चित्रपटात नायक व खलनायकाच्या भूमिका गाजवणारे अभिनेते (मृत्यू: ३ नोव्हेंबर १९९२)
१६९४ : व्होल्टेअर – फ्रेन्च तत्त्वज्ञ व लेखक (मृत्यू: ३० मे १७७८)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९६ : डॉ. मोहम्मद अब्दूस सलाम – भौतिकशास्त्रज्ञ, नोबेल पारितोषिक विजेते (१९७९) एकमेव पाकिस्तानी, विज्ञानातील नोबेल पारितोषिक विजेते एकमेव मुस्लिम (जन्म: २९ जानेवारी १९२६ - संतोकदास, साहिवाल, पंजाब, पाकिस्तान)
१९७० : सर चंद्रशेखर वेंकट रमण – नोबेल पारितोषिक (१९३०) विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ७ नोव्हेंबर १८८८)
१९६३ : चिं. वि. जोशी – विनोदी लेखक व पाली साहित्याचे संशोधक (जन्म: १९ जानेवारी १८९२)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 11 January, 2014 22:48