हा या वर्षातील ३०५ वा (लीप वर्षातील ३०६ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००५ : योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे ३६ वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
२००० : सर्बियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१९९९ : कवी नारायण सुर्वे यांना मध्यप्रदेश सरकारचा ’कबीर पुरस्कार’ हा मानाचा पुरस्कार जाहीर
१९९४ : मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड
१९८२ : अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली. होंडा मोटार कंपनीने मेरिज्‌व्हिल, ओहायो येथे आपला कारखाना सुरू केला. येथे होंडा अ‍ॅकॉर्ड गाड्यांचे उत्पादन सुरू झाले.
१९७३ : ‘मैसूर‘ राज्याचे नाव बदलुन ते ‘कर्नाटक‘ असे करण्यात आले.
१९७३ : लखदीप, मिनिकॉय, अग्निदीव बेटांचे नांव ’लक्षद्वीप’ असे ठेवण्यात आले.
१९६६ : पंजाब राज्याची पंजाब हरियाणा राज्यात विभागणी झाली.
१९५६ : भाषावार प्रांतरचना अस्तित्त्वात आली. राज्य पुनर्रचना कायद्यानुसार महाराष्ट्र हे राज्य अस्तित्त्वात आले. यशवंतराव चव्हाण हे राज्याचे पहिले मुख्यमंत्री झाले.
१९५६ : दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करुन कर्नाटक राज्याची स्थापना करण्यात आली.
१९५६ : केरळ राज्य स्थापना दिन
१९५६ : कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
१९५३ : आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नुल ही त्याची राजधानी होती.
१९४५ : ऑस्ट्रेलियाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.
१८४८ : महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्ट्न, मॅसेच्युसेट्स, यूएसए येथे सुरू झाले. नंतर याचे बोस्टन विश्वविद्यालयात विलीनीकरण झाले.
१८४५ : ग्रँट मेडीकल कॉलेज’ हे भारतातले पहिले वैद्यकीय महाविद्यालय भायखळा, मुंबई येथे सुरू झाले.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९७४ : वी. वी. एस. लक्ष्मण – क्रिकेटपटू
१९७३ : ऐश्वर्या राय – अभिनेत्री
१९४० : रमेश चंद्र लाहोटी – भारताचे ३५ वे सरन्यायाधीश
१९३२ : अरुण बाळकृष्ण कोलटकर – मराठी व इंग्रजी कवी (मृत्यू: २५ सप्टेंबर २००४)
१९२६ : यशवंत देव – संगीतकार व गीतकार
१९२१ : शरद तळवलकर – आपल्या सदासतेज अभिनयाने मराठी रसिकांच्या मनावर प्रदीर्घकाळ प्रसन्नतेचे अधिराज्य गाजवणारे विनोदी कलाकार (मृत्यू: २१ ऑगस्ट २००१)
१८९३ : इंदुभूषण बॅनर्जी – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार (मृत्यू: १३ नोव्हेंबर १९५६ - कोलकता, पश्चिम बंगाल)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००५ : योगिनी जोगळेकर – लेखिका, ४५ कादंबर्‍या, ४ कवितासंग्रह, ४ नाटके, १२ कुमार वाङ्‍मयाची पुस्तके इ. त्यांची साहित्य संपदा आहे. (जन्म: ६ ऑगस्ट १९२५)
१९९६ : ज्युनिअस जयवर्धने – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष (जन्म: १७ सप्टेंबर १९०६)
१९९४ : कॉम्रेड दत्ता देशमुख – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते (जन्म: ? ? ????)
१९९३ : नैनोदेवी – ठुमरी, दादरा व गझल गायिका (जन्म: ? ? ????)
१९९१ : अरुण पौडवाल – संगीतकार व संगीत संयोजक (जन्म: ? ? ????)
१९५० : विभूतीभूषण बंदोपाध्याय – जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक. ’पथेर पांचाली’, ’अपराजित’, ’आरण्यक’ या त्यांच्या काही उत्कृष्ट कलाकृती होत. ’इच्छामती’ या त्यांच्या कादंबरीला रविन्द्र पुरस्कार देण्यात आला. (जन्म: १२ सप्टेंबर १८९४)
१८७३ : दीनबंधू मित्र – बंगाली नाटककार (जन्म: ? ? १८२९ - चौबेरिया, गोपाळनगर, २४ परगणा, पश्चिम बंगाल)


Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Tuesday, 18 February, 2014 18:54