हा या वर्षातील ६० वा (लीप वर्षातील ६१ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२००२ : पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने यूरो हे चलन स्वीकारले.
१९९८ : दाक्षिणात्य गायिका एम. एस. सुब्बलक्ष्मी यांना ’भारतरत्‍न’ हा सर्वोच्‍च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
१९९२ : बोस्‍निया व हेर्झेगोविनाला युगोस्लाव्हियापासून स्वातंत्र्य मिळाले.
१९५४ : प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटापेक्षा ६०० पट जास्त शक्तिशाली होता. तो दिवसासुद्धा १५० किलोमीटर पेक्षा जास्त दूरवर दिसला. या स्फोटामुळे आसपासच्या भागात प्रचंड प्रमाणात किरणोत्सर्ग झाला.
१९४८ : गुवाहाटी उच्‍च न्यायालयाची स्थापना
१९४७ : आंतरराष्ट्रीय नाणे निधिच्या कामकाजास सुरूवात झाली.
१९४६ : ’बँक ऑफ इंग्लंड’चे राष्ट्रीयीकरण झाले.
१९३६ : अमेरिकेतील महाकाय ’हूव्हर धरण’ बांधून पूर्ण झाले.
१९२७ : रत्‍नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेउन चर्चा केली.
१९०७ : ’टाटा आयर्न अँड स्टील कंपनी’ची स्थापना
१८७२ : ’यलो स्टोन नॅशनल पार्क’ या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली.
१८०३ : ओहायो हे अमेरिकेचे १७ वे राज्य बनले.
१५६५ : रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८० : शाहिद अफ्रिदी – पाकिस्तानी क्रिकेटपटू
१९६८ : सलील अंकोला – क्रिकेटपटू
१९३० : राम प्रसाद गोएंका – उद्योगपती (मृत्यू: १४ एप्रिल २०१३)
१९२२ : यित्झॅक राबिन – इस्त्रायलचे ५ वे पंतप्रधान, संरक्षणमंत्री आणि नोबेल पारितोषिक विजेते (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९५)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२००३ : गौरी देशपांडे – कादंबरीकार, लघुकथालेखिका आणि कवयित्री (जन्म: ११ फेब्रुवारी १९४२)
१९९९ : दत्तात्रयशास्त्री धुंडिराज तथा ’दत्तमहाराज’ कवीश्वर – वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, वेदांती पंडित (जन्म: १३ फेब्रुवारी १९१०)
१९९४ : निर्माते, दिग्दर्शक मनमोहन देसाई यांनी आत्महत्या केली (जन्म: २६ फेब्रुवारी १९३७)
१९८९ : वसंतदादा पाटील – महाराष्ट्राचे ५ वे व ९ वे मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ (जन्म: १३ नोव्हेंबर १९१७)
१९५५ : नारायण सदाशिव मराठे तथा ’केवलानंद सरस्वती’ – महाराष्ट्रातील धर्मसुधारणावादी श्रेष्ठ संस्कृत पंडित, संस्कृतमीमांसाकोशाचे संपादक (जन्म: ८ डिसेंबर १८७७)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Saturday, 18 January, 2014 13:16