हा या वर्षातील १९४ वा (लीप वर्षातील १९५ वा) दिवस आहे.

महत्त्वाच्या घटना:

२०११ : मुंबई शहरात झालेल्या ३ बॉम्बस्फोटात २६ जण ठार तर १३० जण जखमी झाले.
१९७७ : रोहित्रावर (transformer) वीज पडल्यामुळे न्यूयॉर्क शहरातील वीजपुरवठा दीर्घकाळ खंडित झाला.
१९५५ : २८ वर्षीय रुथ एलीसला (Ruth Ellis) प्रियकराचा खून केल्याबद्दल फासावर चढविण्यात आले. हॉलो वे तुरूंगातली ही फाशी ग्रेट ब्रिटनमधली स्त्रीकैद्याची अखेरची फाशी ठरली.
१९२९ : जतिंद्रनाथ दास यांनी लाहोर तुरुंगात आपले आमरण उपोषण सुरु केले. या उपोषणातच ६३ दिवसांनी (१३ सप्टेंबर १९२९) त्यांचा मृत्यू झाला.
१९०८ : लोकमान्य टिळकांवर दुसर्‍या राजद्रोहाच्या खटल्याचे काम सुरु झाले.
१८६३ : सक्तीच्या सैन्यभरती विरोधात न्यूयॉर्क शहरात दंगा झाला.
१८३७ : राणी व्हिक्टोरिया बकिंगहॅम पॅलेसमध्ये (Buckingham Palace) राहायला गेली. तेव्हापासून ते इंग्लंडच्या राजाचे/राणीचे अधिकृत निवासस्थान बनले.
१६६० : पावनखिंड झुंजवणार्‍या वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचल्याच्या खुणेच्या तोफांचे आवाज ऐकल्यावर 'आता मी सुखाने मरतो' असे म्हणून प्राण सोडला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९४२ : हॅरिसन फोर्ड – अमेरिकन अभिनेता
१८९२ : केसरबाई केरकर – जयपूर-अत्रौली घराण्याच्या शास्त्रीय गायिका (मृत्यू: १६ सप्टेंबर १९७७)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

२०१० : मनोहारी सिंग – पट्टीचे सॅक्सोफोन वादक (जन्म: ८ मार्च १९३१)
२००९ : निळू फुले – अभिनेते (जन्म: ? ? १९३०)
२००० : इंदिरा संत – साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या कवयित्री व लेखिका (जन्म: ४ जानेवारी १९१४)
१९९४ : पं. कृष्णा गुंडोपंत तथा ‘के. जी.’ गिंडे – शास्त्रीय (धृपद) गायक, संगीतकार व शिक्षक (जन्म: २६ डिसेंबर १९२५)
१९९० : अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ ’बॉबी’ तल्यारखान – क्रीडा समीक्षक व समालोचक (जन्म: ? ? १८९७)
१९६९ : महर्षी न्यायरत्‍न धुंडिराजशास्त्री विनोद – तत्त्वज्ञ, विचारवंत, योगी, स्वातंत्र्य सैनिक आणि लेखक. (जन्म: १२ जानेवारी १९०२)


Check another day
Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Friday, 25 October, 2013 21:34