-: दिनविशेष :-

२२ मे

आंतरराष्ट्रीय जैवविवीधता दिन

International Day for Biological Diversity


Enroll for Standard 10 : Online Class

महत्त्वाच्या घटना:

२००४

भारताचे १३ वे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग सूत्रे हाती घेतली.

१९७२

सिलोनने नवीन राज्यघटना स्वीकारुन ते प्रजासत्ताक बनले. त्या देशाचे श्रीलंका असे नामकरण झाले आणि त्याने राष्ट्रकुल देशांत प्रवेश केला.

१९६१

हुंडाबंदी विधेयकाला राष्ट्रपतींची संमती मिळून हुंडाबंदी कायदा अस्तित्वात आला.

१९४२

दुसरे महायुद्ध – मेक्सिकोने दोस्त राष्ट्रांच्या बाजूने युद्धात उडी घेतली.

१९१५

स्कॉटलंडच्या ग्रेटना ग्रीन गावात ३ रेल्वेगाड्यांची टक्कर होऊन २२७ जण ठार आणि २४६ जण जखमी झाले.

१९०६

राईट बंधूंनी उडणाऱ्या यंत्राचे (Flying Machine) पेटंट घेतले.

१७६२

स्वीडन आणि प्रशियामधे हॅम्बुर्गचा तह झाला.


Enroll for Standard 10 : Online Class

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९८७

नोव्हान जोकोव्हिच – सर्बियाचा टेनिस खेळाडू

१९४०

एरापल्ली अनंतराव श्रीनिवास प्रसन्ना – भारतीय फिरकी गोलंदाज

१९०७

सर लॉरेन्स ऑलिव्हिये – ब्रिटिश अभिनेता, दिग्दर्शक व निर्माता
(मृत्यू: ११ जुलै १९८९)

१८७१

विष्णू वामन बापट – संस्कृत विद्वान, भाषांतरकार व शास्त्रसुधारक, शंकराचार्यांच्या ग्रंथांचे व इतर संस्कृत ग्रंथांचे मराठीत अनुवाद केले.
(मृत्यू: २० डिसेंबर १९३३)

१८५९

सर आर्थर कॉनन डॉइल – स्कॉटिश डॉक्टर व ‘शेरलॉक होम्स‘ या गुप्तहेरकथांचे लेखक
(मृत्यू: ७ जुलै १९३०)

१८१३

रिचर्ड वॅग्‍नर – जर्मन संगीतकार, संगीतसंयोजक व दिग्दर्शक
(मृत्यू: १३ फेब्रुवारी १८८३)

१७७२

राजा राम मोहन रॉय – समाजसुधारक, धर्मसुधारक व ब्राम्हो समाजाचे संस्थापक, कन्याविक्रय, कन्याहत्या, बालविवाह इ. चालींमधून स्त्रीला मुक्त करण्यासाठी त्यांनी आंदोलन उभारले.
(मृत्यू: २७ सप्टेंबर १८३३)


Enroll for Standard 10 : Online Class

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९८

डॉ. मधुकर आष्टीकर – लेखक, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष
(जन्म: १ जानेवारी १९२८)

१९९५

रविंद्र बाबुराव मेस्त्री – चित्रकार व शिल्पकार, कलामहर्षी बाबूराव पेंटर यांचे ज्येष्ठ चिरंजीव, शिवाजीमहाराजांचे पुतळे करण्यात त्यांचा हातखंडा होता. (जन्म: ? ? ????)

१९९१

कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार पुढारी, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अग्रणी नेते, गोवा मुक्ती समितीचे अध्यक्ष. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांना तत्कालीन सोविएत संघराज्यातर्फे ‘ऑर्डर ऑफ लेनिन’ सन्मान प्रदान करण्यात आला.
(जन्म: १० ऑक्टोबर १८९९)

१८८५

व्हिक्टर ह्यूगो – जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबरीकार, कवी आणि लेखक
(जन्म: २६ फेब्रुवारी १८०२)

१८०२

मार्था वॉशिंग्टन – अमेरिकेची पहिली ‘फर्स्ट लेडी’
(जन्म: २ जून १७३१)


Pageviews

This page was last modified on 29 April 2021 at 10:19pm