हा या वर्षातील ११० वा (लीप वर्षातील १११ वा) दिवस आहे.

       महाराष्ट्रात काही गावांच्या नावापुढे ’दुमाला’ हा प्रत्यय असलेला आढळतो. उदा:- कसारा दुमाला, शिरोली दुमाला इ. पूर्वी पेशव्यांच्या कारकिर्दीत मराठा सरदारांना काही गावांची जहागिरी देण्यात येई. मात्र त्यातील काही गावांवर पूर्णपणे त्या सरदाराचा अधिकार नसे. तर पेशवे व तो सरदार अशा दोघांचा अंमल असे. अशा गावांपुढे ’दुमाला’ (दोघांची मालकी) असा प्रत्यय लावत असत!

महत्त्वाच्या घटना:

२०१३ :

राष्ट्रपती प्रणब मुकर्जी यांनी पद्म पुरस्कारांचे वितरण केले:
पद्मभूषण – कविवर्य मंगेश पाडगावकर, उद्योजक आदी गोदरेज, शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल राशिद खाँ, शास्त्रज्ञ ए. एस. पिल्लई, विनोदी कलाकार जसपाल भट्टी (मरणोत्तर), अभिनेते राजेश खन्ना (मरणोत्तर)
पद्मश्री – नाना पाटेकर, दिग्दर्शक रमेश सिप्पी, डिझायनर रितू कुमार, ऑलिम्पीक पदक विजेते योगेश्वर दत्त आणि विजयकुमार

१९४६ : राष्ट्रसंघ (League of Nations) ही संस्था विसर्जित करण्यात आली. पुढे याचेच संयुक्त राष्ट्रांच्या संघटनेमध्ये (United Nations) रुपांतर झाले.
१९४५ : दुसरे महायुद्ध – अमेरिकन फौजांनी लाइपझिग शहराचा ताबा घेतला.
१९३९ : अ‍ॅडॉल्फ हिटलरचा ५० वा वाढदिवस जर्मनीमध्ये सार्वजनिक सुट्टी देऊन साजरा करण्यात आला.
१७७० : प्रसिद्ध दर्यावर्दी व सागर संशोधक कॅप्टन जेम्स कूक यांनी ऑस्ट्रेलिया खंडाचा शोध लावला.

जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:

१९५० : चंद्राबाबू नायडू – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री
१९३९ : सईदुद्दीन डागर – ध्रुपद गायक
१९१४ : गोपीनाथ मोहंती – ज्ञानपीठ पारितोषिक विजेते ओरिया साहित्यिक (मृत्यू: २० ऑगस्ट १९९१)
१८९६ : ह. भ. प. शंकर वामन तथा ’सोनोपंत’ दांडेकर – स. प. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य तत्वज्ञानाचे प्राध्यापक व प्रवचनकार, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाचे प्रणेते (मृत्यू: ९ जुलै १९६८)
१८८९ : अ‍ॅडॉल्फ हिटलर – बव्हेरियाच्या सरहद्दीवरील ब्रानाउ आम इन या गावी सकाळी साडे सहा वाजता नाझी हुकुमशहा अ‍ॅडॉल्फ हिटलरचा जन्म झाला. तो आपल्या बापाच्या तिसऱ्या लग्नसंबंधापासून झालेला तिसरा मुलगा होता. (मृत्यू: ३० एप्रिल १९४५)
१७४९ : मराठा सत्तेचा ध्वज अटकेपार नेणार्‍या पेशव्यांचे श्रद्धास्थान असलेल्या देवदेवेश्वर मंदिराची नानासाहेब पेशवे यांनी पर्वतीवर स्थापना केली.
  ७८८ : [वैशाख शु. १० शके ७१०] आदि शंकराचार्य (मृत्यू: ? ? ८२०)

मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:

१९९९ : कमलाबाई कृष्णाजी ओगले – ’रुचिरा’ या पाकशास्त्रावरील प्रचंड खपाच्या पुस्तकाच्या लेखिका (जन्म: १६ सप्टेंबर १९१३)
१९७० : शकील बदायूँनी – गीतकार आणि शायर (जन्म: ३ ऑगस्ट १९१६ - बदायूँ, उत्तर प्रदेश)
१९६० : अमल ज्योती तथा ’पन्‍नालाल’ घोष – बासरीवादक व संगीतकार (जन्म: २४ जुलै १९११)
१९३८ : ’भारताचार्य’ चिंतामणराव वैद्य – न्यायाधीश, कायदेपंडित, लेखक, आणि इंग्रजी व संस्कृतचे जाणकार. महाभारताच्या मराठी भाषांतराचा समारोप म्हणून त्यांनी लिहिलेल्या ‘महाभारताचा उपसंहार‘ या ग्रंथामुळे लोकमान्यांनी त्यांना ‘भारताचार्य‘ ही पदवी दिली. (जन्म: १८ आक्टोबर १८६१)
१९१८ : कार्ल ब्राऊन – नोबेल पारितोषिकविजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ (जन्म: ६ जून १८५०)

Check another day
Click here to get the best FREE antivirus

Pageviews

This page was updated on Thursday, 1 January, 2015 2:11